Sunday, June 15, 2025
Homeताजी बातमीक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे हे देशभरात हजारो क्रांतिकारक तयार करणारे प्रखर देशभक्त...

क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे हे देशभरात हजारो क्रांतिकारक तयार करणारे प्रखर देशभक्त होते-अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ

“मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी” अशी क्रांतिकारी घोषणा करणारे क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे हे देशभरात हजारो क्रांतिकारक तयार करणारे प्रखर देशभक्त होते. त्यांची देशाप्रती अढळ निष्ठा,त्यागाचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या चिंचवड स्टेशन येथील पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास माजी नगरसदस्या अनुराधा गोरखे, उप आयुक्त रविकरण घोडके, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संजय ससाणे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, सामाजिक कार्यकर्ते मनोज तोरडमल, नितीन घोलप, सुनिल भिसे, नाना कसबे, यादव खिलारे, डॉ.धनंजय भिसे, संतोष जोगदंड, अरूण जोगदंड, जीवन बोऱ्हाडे, सागर तापकीर, दत्तु चव्हाण,सतिश भवाळ,संदीप जाधव,अनिल सौदंडे, दशरथ सकट, स्वप्नील जाधव, सविता आव्हाड, मीना खिलारे, ज्योती वैरागर, केशरताई लांडगे, आदी उपस्थित होतै.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये शाहीर बापू पवार आणि लखन अडागळे यांनी क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जीवनावर आधारित प्रबोधनात्मक शाहिरी सादर केली तर शिवशाहीर मिलिंद ठोंबरे आणि त्यांच्या सहका-यांनी मर्दानी खेळ सादर केले.त्यामध्ये तलवारबाजी, दांडपट्टा,ढाल तलवार अशा विविध युद्ध कला त्यांनी सादर केल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संजय ससाणे यांनी केले तर सूत्रसंचालन आणि आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments