Sunday, June 16, 2024
Homeगुन्हेगारीकोयता गॅंगचा मॉलवर दरोड्याचा प्रयत्न फसला… आरोपीकडून लोखंडी कोयते, मिरची पावडर, तीनचाकी...

कोयता गॅंगचा मॉलवर दरोड्याचा प्रयत्न फसला… आरोपीकडून लोखंडी कोयते, मिरची पावडर, तीनचाकी टेम्पो, दुचाकी जप्त

वाकड परिसरातील बंद दुकाने, मॉलवर रात्री दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या सराईत टोळीला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई गुरुवारी रात्री थेरगाव येथे करण्यात आली. आरोपींकडून तीन लोखंडी कोयते, मिरची पावडर, तीनचाकी टेम्पो, दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

शाम हरी गाडवे (वय २१, रा. आकुर्डी), अतिश भारत सिरसाट (वय १९, रा. लिंकरोड, चिंचवड), नवनाथ दिंगबर साठे (वय ३५, रा. थेरगाव) आणि करण उर्फ कल्ला टाक (रा. पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, शुभम सिद्राम कांबळे (वय १९, रा. भाटनगर, पिंपरी) हा पसार झाला.

आरोपी थेरगाव परिसरात संशयितरित्या थांबल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांना चापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. एक जण पळून गेला. आरोपींकडून तीन लोखंडी कोयते, मिरची पावडर, तीनचाकी टेम्पो, दुचाकी जप्त करण्यात आली. वाकड परिसरातील बंद दुकाने, मॉल हे सुरक्षारक्षकांना कोयत्याचा धाक दाखवून लुटणार असल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments