Saturday, December 7, 2024
Homeगुन्हेगारीतरुणीचे अपहरण करुन विवस्त्र करत मारहाण; विवस्त्रावस्थेतील ध्वनिचित्रफीत सोशल मीडियावर प्रसारित

तरुणीचे अपहरण करुन विवस्त्र करत मारहाण; विवस्त्रावस्थेतील ध्वनिचित्रफीत सोशल मीडियावर प्रसारित

प्रेमप्रकरणातून तरुणीला पळवून नेल्याने तरुणाच्या बहिणीचे अपहरण करुन तिला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. अपहरण केल्यानंतर २४ वर्षीय बहिणीला विवस्त्र करुन खोलीत डांबून ठे‌वून मोबाइल कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करण्यात आले. आरोपींनी सोशल मीडियावर प्रसारित केल्याचे उघडकीस आले आहे.या प्रकरणी सात जणांच्या विरोधात लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नंदकुमार माटे, सुंदराबाई माटे, आरती पिंपळे, बाळासाहेब पिंपळे, सागर जगताप, श्रीराम गोसावी (सर्व रा. उरळी कांचन, पुणे-सोलापूर रस्ता) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित तरुणीच्या बहिणीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार महिला आणि आरोपी नातेवाईक आहेत. आरोपी नंदकुमार माटे यांच्या नात्यातील तरुणीस तक्रारदार महिलेच्या भावाने पळवून नेल्याचा संशय आरोपींना होता. आरोपींनी तक्रारदार महिला आणि तिच्या बहिणीचे अपहरण केले. माटे यांनी नात्यातील तरुणीचा ठावठिकाणा विचारला. दोघींनी ठावठिकाणा सांगितला नाही. त्यामुळे आरोपींनी दोघींना गजाने मारहाण केली. एका खोलीत त्यांना दोन दिवस डांबून ठेवले.

तक्रारदार महिलेच्या बहिणीस विवस्त्र करुन तिचे मोबाइल कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण केले. चित्रीकरण त्यांनी समाजमाध्यमात प्रसारित केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक काळे तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments