Monday, October 7, 2024
Homeताजी बातमीखडकवासला धरण भरले; मुठा नदीतून पाण्याचा विसर्ग सुरू

खडकवासला धरण भरले; मुठा नदीतून पाण्याचा विसर्ग सुरू

गेल्या काही दिवसांपासून खडकवासला परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे धरण १०० टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे यंदाच्या मोसमी पावसाच्या हंगामात पहिल्यांदाच खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे.

जिल्हा प्रशासनाने ही माहिती दिली. पुणे शहर परिसरात पावसाचे प्रमाण कमी असले, तरी घाटमाथा आणि धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे खडकवासला धरण साखळीतील धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा होत असून खडकवासला धरण पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहे.

या पार्श्वभूमीवर, काल सायंकाळी पासून खडकवासला धरणातून १ हजार क्युसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात येणार आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात कोणतेही साहित्य किंवा जनावरे असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे. सखल भागातील नागरिकांना सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments