Friday, October 4, 2024
Homeताजी बातमीपिंपरी -चिंचवड महापालिका उपमहापौरपदासाठी भाजपकडून केशव घोळवे यांचा अर्ज तर राष्ट्रवादी कडून...

पिंपरी -चिंचवड महापालिका उपमहापौरपदासाठी भाजपकडून केशव घोळवे यांचा अर्ज तर राष्ट्रवादी कडून निकिता कदम यांचा अर्ज दाखल

२ नोव्हेंबर २०२०
पिंपरी -चिंचवड महापालिका उपमहापौरपदाचा उमदवारी अर्ज आज दुपारी केशव घोळवे यांनी दाखल केला. उपमहापौरपद भोसरी की पिंपरीला द्यायचे याबाबत रविवारी दिवसभर भाजपमध्ये खलबते सुरू होती. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांनी केशव घोळवे यांचे नाव कळविले. त्यानुसार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमहापौरपदासाठी नगरसेवक केशव घोळवे यांनाच संधी देण्यात यावी, असा आदेश शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे याना कळविला आहे, असे सूत्रांकडून समजले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असून पक्षीय बलाबल अधिक असल्याने उपमहापौर हा भाजपचा होणार आहे. स्थायी समिती, महापौर, विविध समित्यांचे सभापती अशी प्रमुखपदे चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघात दिली गेली आहेत. त्यामुळे उपमहापौरपद पिंपरीत मिळावं, अशी मागणी भाजपच्या जुन्या गटानी केली होती.

आमदार लांडगे गटाने वसंत बोराटे यांचे नाव पुढे केले होते. केशव घोळवे यांना संधी मिळाल्याने भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे व आ. लक्ष्मण जगताप यांना हा धक्का असल्याचे मानले जाते. यावेळी महापौर उषा ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार पदाधिकारी उपस्थित होते.

तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमहापौर पदासाठी निकिता कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, राजू बनसोडे, प्रविण भालेकर, प्रवक्ते फजल शेख आदी उपस्थित होते.

उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत आज सोमवार (दि.०२) रोजी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत होती. तर शुक्रवारी ६ नोव्हेंबर रोजी ही निवडणूक होणार

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments