पिंपरी चिंचवड शहरातील कर्तृत्ववान व्यक्तींना दिला जाणारा एक आगळा-वेगळा सन्मान सोहळा…!!!
ज्यांच्या कार्याने उंचावली शहराची शान, चला, करूया त्यांचा सन्मान..!!
News14 Media Network ने आपल्या शहरातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या योगदानाला नेहमीच सलाम केला आहे. त्यांच्या कर्तृत्वाला योग्य ओळख मिळवून देण्यासाठी आणि शहराच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्याच्या परंपरेला पुढे नेत, आम्ही अभिमानाने सादर करत आहोत:
पिंपरी चिंचवड सन्मान-2025, “सन्मान कार्याचा, गौरव शहराचा “
पिंपरी-चिंचवड हे शहर देशातील सर्वाधिक वेगाने प्रगती करणारे एक प्रमुख केंद्र आहे. औद्योगिक क्षेत्रातील भरीव योगदान, व्यावसायिक यश, सामाजिक कार्यातली समर्पित भूमिका, प्रशासकीय कामगिरी, शैक्षणिक क्षेत्रातील क्रांतीकारी वाटचाल आणि सांस्कृतिक वैभवाने हे शहर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले वेगळेपण सिद्ध करते.
शहराच्या या यशस्वी प्रवासामागे ज्यांनी योगदान दिले, त्यांचा सन्मान करणारा हा एक आगळावेगळा सोहळा आहे..!!
पिंपरी-चिंचवड सन्मान 2025 हा केवळ एक सन्मानाचा सोहळा नाही, तर आपल्या शहराच्या वैभवाचा गौरव करण्याचा संकल्प आहे. या सोहळ्यातून प्रेरणा घेत पुढील पिढ्यांनाही त्यांच्या कर्तृत्वाची ओळख निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
👉 अधिक अपडेट्ससाठी भेट द्या: www.news14live.com
संपादक –
श्री. अविनाश पार्वती किसनराव कांबीकर
+91 98226 96578
News14 Media Network
