Wednesday, July 15, 2026
Homeआंतरराष्ट्रीयअफगाणिस्तानचे दुसरे सर्वात मोठे शहर कंदाहार तालिबानच्या ताब्यात; २४ तासांत ३ शहरांवर...

अफगाणिस्तानचे दुसरे सर्वात मोठे शहर कंदाहार तालिबानच्या ताब्यात; २४ तासांत ३ शहरांवर ताबा

१३ ऑगस्ट २०२१,
तालिबानी दहशतवादी अफगाणिस्तानात पाय पसरत असून, काही जणांच्या मते देशातील ६० टक्के भूप्रदेश त्यांच्या अमलाखाली आला आहे. अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याच्या माघारी परतल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या शहरावर ताबा मिळवला आहे. अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या रक्तरंजित संघर्षादरम्यान तालिबानने शुक्रवारी अफगाणिस्तानचे दुसरे मोठे शहर कंदाहार ताब्यात घेतले. तालिबानने शुक्रवारी दावा केला की त्यांनी आणखी एक प्रांतीय राजधानी कंदाहार ताब्यात घेतले आहे. आता फक्त राजधानी काबूल शिल्लक आहे. काबुलनंतर कंदाहार हे अफगाणिस्तानमधील दुसरे मोठे शहर आहे.

अफगाणिस्तानवर तालिबानची पकड हळूहळू मजबूत होत आहे. तालिबानचे पुढील लक्ष्य काबूल असेल. कंदाहारमध्ये काही दिवसांपूर्वी भारतीय छायाचित्रकार दानिशची तालिबानने हत्या केली होती. गुरुवारी तालिबानने कंदाहारवर ताबा मिळवण्यापूर्वी आणखी दोन प्रांतीय राजधानी गझनी आणि हेरातवर ताबा मिळवला. तालिबान काबूलपासून अवघ्या १३० किमी अंतरावर आहेत. अशाप्रकारे, दहशतवादी संघटनेने आतापर्यंत १२ प्रांतीय राजधानी ताब्यात घेतल्या आहेत. गझनीमध्ये अतिरेक्यांनी पांढरे झेंडे फडकवले. दोन स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की शहराबाहेरील लष्करी आणि गुप्तचर तळावर अजूनही तुरळक लढाई सुरू आहे.

दरम्यान, अशावेळी लढण्याची राजकीय इच्छाशक्ती आहे काय हे अफगाणी नेतृत्वाला ठरवायचे असल्याचे व्हाइट हाऊसने बुधवारी सांगितले. गेली दोन दशके आपण ज्यांना प्रशिक्षण दिले, त्या अफगाणी राष्ट्रीय दलांजवळ लढण्यासाठी क्षमता आणि युद्धसाहित्य असल्याचे बायडेन प्रशासनाने सांगितले.

‘अखेर अफगाणी राष्ट्रीय संरक्षण दलांकडे लढाईत प्रत्युत्तर देण्यासाठी युद्धसाहित्य, संख्याबळ आणि प्रशिक्षण आहे. त्यांना जे आवश्यक आहे, ते त्यांच्याजवळ आहे. त्यांच्याजवळ राजकीय इच्छाशक्ती आहे का त्यांची लढण्यासाठी नेते म्हणून संघटित होण्याची क्षमता आहे का ते त्यांनी ठरवण्याची गरज आहे’, असे व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी जेन सॉकी यांनी पत्रकारांना सांगितले.

अफगाणिस्तानच्या काही भागांतील ढासळत्या सुरक्षाविषयक परिस्थितीकडे अमेरिका बारकाईने लक्ष ठेवून आहे, मात्र त्याचे काही विविक्षित निष्पन्न होण्याची शक्यता नाही, असे त्या म्हणाल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments