Friday, June 21, 2024
Homeताजी बातमीपत्रकार शशिकांत वारिसे यांचा जाणीवपूर्वक अपघात घडवून आणला, विधानपरिषदेत सरकारची लेखी उत्तरात...

पत्रकार शशिकांत वारिसे यांचा जाणीवपूर्वक अपघात घडवून आणला, विधानपरिषदेत सरकारची लेखी उत्तरात कबुली…

पत्रकार शशिकांत वारिसे यांचा जाणीवपूर्वक नाणार परिसरात वाहन अपघात घडवून आणल्याची कबुली सरकारनं दिली आहे. विधान परिषदेत विरोधकांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाला सरकारच्या वतीनं लेखी उत्तर देण्यात आलं आहे. सध्या या प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरु असल्याची देखील माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील ‘महानगरी टाईम्स’ या वृत्तपत्राचे पत्रकार शशिकांत वारिसे यांचा अपघाती मृत्यू झाला. काही दिवसापूर्वीच राजापूर येथील पेट्रोल पंपावर त्यांना थार गाडीनं जोरात धडक दिली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रत्नागिरीहून कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले होते. यावेळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. शशिकांत वारिसे यांचा हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप रिफायनरीविरोधी संघटनेने केला आहे. रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यू प्रकरणात आता कार चालक पंढरीनाथ आंबेरकर याला अटक केली असून हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शशिकांत वारिसे यांच्या हत्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी पंढरीनाथ आंबेरकर हा रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील कुंभवडे या गावचा रहिवासी. सुरुवातीच्या काळात छोटासा आंबा व्यापारी असलेला पंढरीनाथ आंबेरकर 2017 सालानंतर मात्र आर्थिकदृष्टीने सक्षम झाला. कोकणात नाणार रिफायनरी प्रकल्पाची घोषणा झाली आणि त्यानंतर त्याने काही जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार सुरु केले. स्वतः देखील काही जमिनी खरेदी केल्या. यामध्ये त्याला आर्थिक नफा चांगलाच झाला. दरम्यानच्या काळात टूर्स अँड ट्रॅव्हल्स आपला व्यवसाय सुरु केला आणि वाढवला. नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द झाला आताची घोषणा बारसू आणि सोलगाव येथे झाली. या ठिकाणी देखील आंबेरकर याने जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार सुरु केले. त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची चौकशी एसआयटी (SIT) मार्फत होणार असल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले होते. वारिसे यांच्या मृत्यूची चौकशी एसआयटी मार्फत करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्याप्रमाणे मृत्यूच्या पाच दिवसानंतर म्हणजे 11 फेब्रुवारी 2023 ला देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले होते..

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments