Thursday, May 15, 2025
Homeआंतरराष्ट्रीयपत्रकाराचं डोकं कलम करणारा दहशतवादी पाकिस्तानचा पाहुणा, अमेरिकेने लाथाडलं

पत्रकाराचं डोकं कलम करणारा दहशतवादी पाकिस्तानचा पाहुणा, अमेरिकेने लाथाडलं

अमेरिकी पत्रकार डेनियल पर्ल याचं शिर धडापासून वेगळं करत हत्या करणाऱ्या अल कायदाच्या दहशतवाद्याला पाकिस्तान पाठिशी घालत असल्याचा आरोप होतोय. यावरुन अमेरिकेने देखील पाकिस्तानला चांगलंच लाथाडलं आहे. पाकिस्तानमधील न्यायालयाने या आरोपीला सोडून देण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे जगभरातून टीकेची झोड उठलीय. अमेरिकेने कठोर भूमिका घेतल्यानंतर आता पाकिस्तानने पत्रकार पर्लची हत्या करणाऱ्या दहशतवादी उमर शेखविरोधात करण्यासाठी पावलं उचलली आहेत. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने ब्रिटनमध्ये जन्म झालेला आरोपी उमर शेख सईदला तुरुंगातून सरकारी गेस्ट हाऊसमध्ये नजरकैद ठेवण्याचे आदेश दिलेत. उमर शेख नजरकैदेत असताना त्याला आपल्या कुटुंबीयांना भेटता येणार आहे. या काळात त्याला मोबाईल फोन किंवा इंटरनेट वापरण्यास मात्र बंदी असले.

डेनियल पर्ल अमेरिकेच्या ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’मध्ये दक्षिण आशिया ब्युरो चीफ होता. जानेवारी 2002 मध्ये त्याचं दहशतवाद्यांनी अपहरण केलं. काही दिवसांनंतर पर्ल यांचं शिर धडापासून वेगळं करुन हत्या करण्यात आली. पर्ल मुस्लीम दहशतवादावर अभ्यास करत होते. या प्रकरणी उमर शेख मुख्य आरोपी आहे. सिंध न्यायालयाने एप्रिल 2020 मध्ये त्याला 7 वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र त्याने आधीच 18 वर्षे तुरुंगात काढल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्याची मुक्तता केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments