Sunday, August 16, 2026
Homeउद्योगजगतहिंजवडीत दहशतवादविरोधी संयुक्त मॉक ड्रिल; एनएसजी, पिंपरी-चिंचवड पोलिसांसह कंपन्यांचा सहभाग

हिंजवडीत दहशतवादविरोधी संयुक्त मॉक ड्रिल; एनएसजी, पिंपरी-चिंचवड पोलिसांसह कंपन्यांचा सहभाग

हिंजवडीतील इन्फोसिस फेज येथे सुरक्षा रक्षकपोलीस अधिकारी  विविध यंत्रणांना दहशतवादविरोधी कारवाईचे प्रात्यक्षिकप्रशिक्षण

भविष्यात कोणत्याही ठिकाणी दहशतवादी हल्ल्याची घटना घडल्यास त्याला तात्काळ व प्रभावी प्रतिसाद देता यावा, तसेच सुरक्षा यंत्रणांमध्ये समन्वय वाढविण्याच्या उद्देशाने हिंजवडी येथील इन्फोसिस फेज-२ परिसरात एनएसजी (नॅशनल सिक्युरिटी गार्ड) आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या मॉक ड्रिलमध्ये एनएसजी, मुंबईच्या २६ स्पेशल कॉम्पोझिट ग्रुपचे अधिकारी व कमांडो यांनी सहभाग घेत विविध दहशतवादविरोधी कारवायांचे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी अमेरिकन सैन्य दलातील अधिकारीदेखील निरीक्षक म्हणून उपस्थित होते.

या सरावात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखा (ATC), दंगल नियंत्रण पथक (RCP), बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS), हिंजवडी वाहतूक विभाग, स्थानिक पोलीस अधिकारी तसेच महापालिका, एमआयडीसी, इन्फोसिस कंपनीचे अधिकारी, सुरक्षा कर्मचारी आणि आपत्कालीन व्यवस्थापनाशी संबंधित विविध यंत्रणांचे प्रतिनिधी सहभागी झाले.

मॉक ड्रिलदरम्यान दहशतवादी हल्ला झाल्यास घटनास्थळी कशा प्रकारे प्रतिसाद द्यायचा, नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर, इमारतीतील लोकांची सुटका, इमारतीचा कॉर्डन, संशयितांचा शोध, बॉम्ब शोध व निकामी करण्याची प्रक्रिया, तसेच विविध सुरक्षा यंत्रणांमधील समन्वय याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण देण्यात आले.

या उपक्रमामुळे औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा रक्षक, पोलीस दल आणि संबंधित यंत्रणांची आपत्कालीन परिस्थितीतील तयारी अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून, भविष्यातील संभाव्य दहशतवादी धोक्यांना प्रभावीपणे सामोरे जाण्याची क्षमता वाढणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments