Sunday, December 3, 2023
Homeअर्थविश्वजिओ फायनान्शियलची शेअर बाजारात एन्ट्री; 10 सत्रांमध्ये इंट्रा-डे व्यवहाराला बंदी

जिओ फायनान्शियलची शेअर बाजारात एन्ट्री; 10 सत्रांमध्ये इंट्रा-डे व्यवहाराला बंदी

रिलायन्सपासून विभक्त झालेल्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस (Jio Financial Services) ने आज बाजारात प्रवेश केला. बीएसईवर कंपनीच्या शेअर्सची 265 रुपयांपासून तर एनएसईवर 262 रुपयांपासून सुरूवात झाली. पूर्वी ही कंपनी रिलायन्सचा एक भाग होती आणि आता ती तिच्यापासून वेगळी झाली आहे आणि बाजारात सूचीबद्ध झाली आहे. रिलायन्सच्या भागधारकांना प्रत्येक शेअर्समागे या कंपनीचा एक शेअर मिळाला. जिओ फायनान्शियलचे शेअर्स भागधारकांना मिळाले असले तरी ते परंतु पुढील 10 व्यापार दिवसांसाठी इंट्रा-डे ट्रेडिंग करू शकणार नाहीत, म्हणजेच ते ट्रेड-टू-ट्रेड सेगमेंटमध्येच राहतील.

जिओ फायनान्शियलच्या शेअर्सची किंमत
गेल्या महिन्यात, ही कंपनी विभक्त प्रक्रियेअंतर्गत रिलायन्स इंडस्ट्रीजपासून विभक्त झाली आणि तिच्या शेअरची किंमत रु. 261.85 वर काढण्यात आली. पहिले 10 दिवस जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस टी-ग्रुप सेगमेंटमध्ये व्यापार करेल. याचा अर्थ शेअरमध्ये इंट्रा-डे ट्रेडिंग शक्य होणार नाही. यासह 5 टक्क्यांचा अप्पर आणि लोअर सर्किट मर्यादा असेल. याद्वारे शेअर्समधील मोठे चढ-उतार थांबविण्याची कारवाई केली जाईल.

रिलायन्सच्या गुंतवणूकदारांवर काय परिणाम
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या गुंतवणूकदारांना त्यांच्या डिमॅट खात्यांमध्ये 1:1 च्या प्रमाणात शेअर्स जमा केले गेले. याचा अर्थ असा की जर तुमच्याकडे रिलायन्स इंडस्ट्रीजचा एक शेअर असेल आणि तुम्ही रेकॉर्ड तारखेपर्यंत म्हणजेच 20 जुलैपर्यंत कायम ठेवला असेल, तर आपोआप Jio Financial Services चा एक शेअर पोर्टफोलिओमध्ये दिसून येईल.

गेल्या वर्षी रिलायन्स इंडस्ट्रीजने या विलगीकरणाची घोषणा केली होती. यामुळे Jio Financial Services ही या क्षेत्रातील भारतातील पाचवी सर्वात मोठी कंपनी बनली आहे. अलीकडे Jio Financial ने म्युच्युअल फंड उद्योगात प्रवेश करण्यासाठी BlackRock सोबत 50:50 JV अस्तित्वाची घोषणा केली आहे.

जिओ फायनान्शियलमध्ये कोणत्या संस्थांची किती गुंतवणूक
रिलायन्सची जिओ फायनान्शियलमध्ये 46 टक्के, एलआयसीची 7 टक्के, बँक ऑफ न्यू यॉर्क मेलन (Bank of New York Mellon) चे 2 टक्के, एसबीआय म्युच्युअल फंड 2 टक्के यांच्यासह इतर संस्थांची भागिदारी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments