जीतो महिला विभाग आपल्यासाठी घेऊन येत आहे भव्य बाजार प्रदर्शन २०२३ या मध्ये महिलांनी बनवलेले डिझायनर साडी, डिझायनर ज्वेलरी , होम मेड डेकोरेशन वस्तू , भेटवस्तू , मॅट , विविध गिफ्टस् तसेच राखी , मेंहदी, आणी बरेच काही तसेच लहान मुलांसाठी विविध गेम्सचे मेमरी गेम्स, बॅालिवूड डॅान्स आणी विविध पदार्थांचे खाण्याचे स्टाॅल्स तसेच येणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी प्रत्येक तासाला लकी ड्रा काढण्यात येणार आहे.
जीतो चिंचवड लेडीज विंगच्या चेयरपर्सन वैशाली बाफना आणि सहसचिव डाॅ.योगिता लुंकड यांनी सांगितले कि या प्रदर्शनात आपल्याला विविध क्षेत्रात काम करणा-य महिलाचा उत्कृष्ट दर्जाचा उत्पादनाचा खजाना बघायला मिळेल ड्रेसेस,सारीज,डिझाइनर ज्वेलरी, होम ङेकाॅर , बेडशीट, चटाई , गिफ्ट हॅम्परस,चाकलेट,मातीची भांडी,राखी,मेहंदी,मसाले,सर्व प्रकारचे खाद्य पदार्थ तसेच लहान मुलांसाठी मेमरी गॆम ,ब्रेन मैपिंग , बॉलीवुड डान्स अक्टिवटी आणि खुप काही असणार आहे असे प्रोजेक्ट इन्चार्ज पुनम बंब आणि कन्वेनर सोनल भंडारी यांनी सांगितले. विशेष म्हणजे दर तासाला लकी ड्राॅ सर्व कुटुंबासह या प्रदर्शनाला भेट दया आणि मनसोक्त खरेदीचा आनंद लुटा असे आवाहन जीतो चिंचवड पिंपरी चॅपटर लेडिज विंग तफेॅ करण्यात आले आहे.

या भव्य बाजार प्रदर्शनाचे जितो पिंपरी चिंचवड महिला विभागातर्फे आयोजन करण्यात आले असून उद्योजक महिला घडाव्यात तसेच महिलांनी बनवलेल्या विविध वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहीती जितो महिला विभागाच्या प्रमुख वैशाली बाफना यांनी दिली , यावेळी डॅा. योगीता लूकंड मुख्य सचिव , पूनम बंब तसेच सोनल भंडारी आणी इतर सर्व जितो महिला विभागाचे सदस्य उपस्थित होते.
जीतो महिला भव्य बाजार प्रदर्शन २०२३
स्थळ – पाटीदार भवन , गणेश तलावा जवळ प्राधिकरण निगडी
दिनांक – 20 अगस्त 2023
वेळ – सकाळी 9 ते रात्री 9 पर्यन्त