Wednesday, January 22, 2025
Homeताजी बातमीविधानसभेत जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला… सभागृहात एकच हशा

विधानसभेत जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला… सभागृहात एकच हशा

एकनाथ शिंदे फक्त “उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री” म्हणून थांबताच देवेंद्र फडणवीसांनी…!

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आजपर्यंतची सर्वात मोठी फूट पडून दोन आठवडे उलटले आहेत. २ जुलै रोजी अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या इथर ८ आमदारांसह मंत्रीपदाची शपथ घेतली. खुद्द अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यानंतर अजित पवार गटासाठी खातेवाटप, शिंदे गट व भाजपाच्या मंत्र्यांची गेलेली खाती, अजित पवारांना मिळालेलं अर्थखातं अशा अनेक मुद्द्यांवर राजकारण रंगलं. या पार्श्वभूमीवर १७ जुलै अर्थात आजपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनात राजकीय खडाजंगी पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर पहिल्या मिनिटातच त्याचा प्रत्यय आला!

नेमकं झालं काय?

विधानसभेच्या नियोजित कार्यक्रमाप्रमाणे सभागृहाचं कामकाज सुरू होताच विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नव्या मंत्र्यांचा परिचय करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जागेवर उभं राहात नव्या मंत्र्यांची माहिती सभागृहाला द्यायला सुरुवात केली. एकनाथ शिंदे यांनी पहिलंच नाव अजित पवार यांचं घेतल्यामुळे त्यावर विरोधी बाकांवरून काहीतरी प्रतिक्रिया येणार असा अंदाज होता. झालंही तसंच!

एकनाथ शिंदेंनी अजित पवारांचा परिचय करून देताना “उपमुख्यमंत्री व वित्त” असा उल्लेख केला आणि ते थांबले. त्यांनी पलीकडच्या बाकावर बसलेल्या अजित पवारांकडे पाहिलं. हे पाहून बाजूलाच बसलेल्या देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना “नाव सांगा”, असं म्हटल्यानंतर एकनाथ शिंदेंनी अजित पवारांचं नाव घेतलं.

“त्यांची-आमची जुनी ओळख!”

यानंतर अजित पवारांनी उभं राहात सगळ्यांना नमस्कार करून अभिवादन केलं. अजित पवार बसत असतानाच समोर विरोधी बाकांवर बसलेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी मिश्किल शब्दांत टोला लगावला. “त्यांची-आमची जुनी ओळख आहे”, असं जयंत पाटील म्हणताच सभागृहात हास्याची लकेर उमटली. तशीच ती अजित पवारांच्या चेहऱ्यावरही दिसून आली!

अजित पवारांनंतर एकनाथ शिंदे यांनी अजित पवार गटातील इतर मंत्र्यांचाही परिचय सभागृहाला करून दिला. यामध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा अत्राम, संजय बनसोडे, आदिती तटकरे, अनिल पाटील या नव्या मंत्र्यांची नावं मुख्यमंत्र्यांनी घेतली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments