बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानने त्याच्या ब्लॉकबस्टर चित्रपट रेकॉर्ड बुकमध्ये आणखी एक नवे पान जोडले आहे. ऍटली दिग्दर्शनाने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवर बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडले आहे आणि सर्वकालीन सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांमध्ये जवान आपले नाव कोरत आहे
ताज्या अहवालांनुसार, जवान ने जागतिक स्तरावर 500 कोटींचा टप्पा ओलांडणारा सर्वात वेगवान बॉलिवूड चित्रपट म्हणून इतिहास रचला होता.जवानने केवळ भारतातच 319.08 कोटी रुपयांचे आश्चर्यकारक कमाई केलेली असून चित्रपटाला केवळ सहा दिवसांत ३०० कोटींचा टप्पा ओलांडलेल्या चित्रपटांच्या विशेष क्लबमध्ये स्थान दिले आहे. एवढेच नाही तर जवानने वेग -वेगळे चित्रपट जसे कि जानेवारीत रिलीज झालेल्या पठाणला मागे टाकले , ज्याने सात दिवसांत ३०० कोटींचा आकडा पार केला होते आणि हिट सनी देओल चित्रपट गदर 2 , ज्याने आठ दिवसात हे लक्ष्य गाठले होते.
‘जवान’ने मंगळवारी जगभरातील बॉक्स ऑफिसवर 600 कोटी रुपयांची कमाई केली.चित्रपटाने सहा दिवसांत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर एकूण कमाई 408 कोटी रुपये जमा केले होते त्याच बरोबर, चित्रपटाचे परदेशातील कलेक्शन अंदाजे रु. 205 कोटींवर पोहोचले, ज्यामुळे जवानने जागतिक कमाई रु. 610 कोटींच्या टप्पा पार केला आहे.
यासह, या वर्षाच्या सुरुवातीला SRK च्या पठाणने तयार केलेल्या पूर्वीच्या रेकॉर्डला ग्रहण करून, जवान आता ही ऐतिहासिक कामगिरी गाठणारा सर्वात वेगवान बॉलिवूड चित्रपट बनला आहे.
पुढील तीन आठवद्यात असा अंदाज दिसतोय कि , जवान हा SRKचा सलग दुसरा चित्रपट बनण्याच्या मार्गावर आहे ज्याने जगभरात बॉक्स ऑफिसवर रु. 1000 कोटींचा टप्पा ओलांडला आहे, जे आता पर्येंत कोणत्याही भारतीय अभिनेत्याकडून झालेले नाही .