२२ डिसेबंर
खाजगी तत्त्वारील तेजस एक्स्प्रेस जानेवारी 2020 पासून मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणार आहे. तेजस एक्स्प्रेसचे दर इतर एक्स्प्रेसच्या तुलनेत जास्त असतील अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
ऑक्टोबर 2019 मध्ये देशातली पहिली खाजगी तेजस एक्स्प्रेस दिल्ली ते लखनऊ या मार्गावर धावली. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने या दोन्ही खाजगी एक्स्प्रेस चालवण्यात येतील.
मुंबई-अहमदाबाद सकाळी 6.40वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 1.10वाजता अहमदाबादला पोहोचेल. मुंबई सेंट्रलहून ही गाडी दुपारी 3.40ला सुटेल आणि त्याच दिवशी रात्री मुंबईला 9.55 वाजता पोहोचेल. गुरुवारव्यतिरिक्त अन्य सर्व दिवशी ही ट्रेन धावेल.