Monday, July 15, 2024
Homeअर्थविश्व"जैसा भाव, तैसा मी" सत्यम ज्वेलर्स तर्फे गणपतीसाठी विविध आभूषणांची रेलचेल 

“जैसा भाव, तैसा मी” सत्यम ज्वेलर्स तर्फे गणपतीसाठी विविध आभूषणांची रेलचेल 

आपल्याला लाडक्या बाप्पाला अनेक रूपांमध्ये बघायला आवडतं. जसं की बाप्पा आपल्याला कधी विविध देवांच्या रूपात दिसतो तर कधी तो शेतकरी किंवा जवानाच्या रूपातही दिसतो. आपल्याला कधी तो बाल रूपात दिसतो तर कधी बाहुबलीच्या रूपात. पण बाप्पा कुठल्याही रूपात असला तरी तो आपल्याला तितकाच आवडतो. किंबहुना आपल्या मनात जसा भाव आहे बाप्पा आपल्याला तसाच दिसतो.

यंदाच्या वर्षी सत्यम ज्वेलर्स हाच विचार घेऊन गणेशोत्सव साजरा करीत आहे. “जैसा भाव, तैसा मी” असे यंदाच्या गणेशोत्सवाचे सार आहे.    

भारतीय परंपरेमध्ये गणेशोत्सवाला विशेष महत्व आहे. हा भव्य उत्सव संस्कृती, श्रद्धा आणि अखंड समाजाला सांस्कृतिकरित्या पुढे घेऊन जाणारा आहे. सत्यम ज्वेलर्स तुम्हाला ह्या समृद्ध परंपरेचा आणि गणेश भक्तीच्या समृद्ध भावनेतील सखोल श्रद्धेचा शोध घेऊन हा उत्सव साजरा करण्यासाठी आमंत्रित करीत आहे.

भक्तांचा पाहुणचार स्वीकारण्यासाठी लाडक्या गणरायाचे आठवडाभरात आगमन होणार असून त्याच्या स्वागतासाठी अबालवृद्ध आतुरले आहेत. गणरायाच्या आदरातिथ्यात कमी राहू नये, यासाठी चांदीचे पूजेचे साहित्य खरेदी करण्यास भाविक पसंती देत आहेत.

भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला महासिद्धीविनायकी चतुर्थी असे म्हणतात. हिलाच शिवा असेही म्हटले जाते. गाणपत्य संप्रदायाचे हे महत्त्वाचे व्रत मानले जाते. गणेश चतुर्थीची प्रचलित आख्यायिका अशी आहे की – एकदा गणपती चतुर्थीचे स्वतःचे आवडीचे मोदक खाऊन उंदराच्या पाठीवरून जात होता. वाटेत साप पाहिल्याने उंदिर भयाने कापू लागला. यामुळे गणपती उंदराच्या पाठीवरून खाली पडला व त्याचे पोट फाटून मोदक बाहेर पडले. गणपतीने ते सारे मोदक पुनः पोटात टाकले व पोटावर साप बांधला. हे दृश्य पाहून आकाशातील चंद्र हसू लागला. म्हणून “तुझे चतुर्थीस कोणी दर्शन करणार नाही” असा शाप गणपतीने चंद्रास दिला अशी आख्यायिका प्रचलित आहे.

माघ महिन्यातील चतुर्थीला माघी चतुर्थी असे म्हटले जाते. हा गणपतीचा जन्म दिन होय. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरीय अशा चार अवस्था मानल्या गेल्या आहेत. चतुर्थी ही तुरीयावास्था म्हणजे आत्मिक साधनेची एक अवस्था मानली गेली आहे असे भारतीय तत्त्वज्ञान मानते.

सुखकर्ता, विघ्नहर्ता गणरायाचा उत्सव १९ सप्टेंबरपासून सुरू होतो आहे. गणपतीची मूर्ती घरी आणण्यापासून ते अगदी विसर्जनापर्यंत गणेशोत्सवाची धामधूम असते. अशा या लाडक्या बाप्पाच्या पूजेसाठी चांदीच्या वस्तू खरेदीला पसंती दिली जाते.

जसं म्हटलं कि, बाप्पा हा कुठल्याही रूपात आपल्याला भावतो. याचसाठी खास सत्यम ज्वेलर्सने आपल्यासाठी गणपतीचे काही खास कलेक्शन आणलेले आहे. सत्यम ज्वेलर्सने आपल्या ग्राहकांसाठी लहान, मोठ्या आकाराची चांदीची गणेश मूर्ती, दुर्वा, दुर्वांचा हार, जास्वंदीचे फुल, जास्वंदीच्या फुलांचा हार, विडा सुपारी, मोदक, मोदकांची रास, तुळस, तुळशी वृंदावन, केवड्याचे पान, निरांजणी, दिवा, पंचपाळे, बाजूबंद, गणेशाचे वाहन उंदिरमामा यासह पाट, ताम्हण, गडवा, पेला, तक्क्या, पळी यांसारख्या वस्तू विविध आकार आणि डिझाईन्समध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments