२० डिसेंबर
‘शिवप्रताप’ या सिनेमालिकेअंतर्गत ‘वाघनख’, ‘वचपा’ आणि ‘गरूडझेप’हे सिनेमे असतील. ‘शिवप्रताप’ ह्या चित्रपट मालिकेतील पहीला चित्रपट ‘वाघनखं’ दि. ६ नोव्हें. २०२० ला प्रदर्शीत होणार आहे. येत्या जानेवारी महिन्यात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होत आहे. अभिनेते डॉ. अमोल कोल्हे मोठ्या पडद्यावरही शिवरायांची भूमिका करण्यासाठी सज्ज झाले आहेत. आगामी वर्षात ते तीन शिवकालीन सिनेमांची निर्मिती करणार आहेत. ‘शिवप्रताप’ या सिनेमालिकेअंतर्गत ‘वाघनख’, ‘वचपा’ आणि ‘गरूडझेप’ अशा शीर्षकांचे हे सिनेमे असतील. हे तिन्ही सिनेमे मराठी आणि हिंदी भाषांमध्ये चित्रीत आणि प्रदर्शित केले जाणार आहेत. ‘छत्रपती शिवाजी महाराजांवर जितके सिनेमे येतील तितके कमीच आहे. प्रत्येक दिग्दर्शकाचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. महाराजांचा आणि त्यांच्या शिलेदारांचा पराक्रम सिनेमाच्या निमित्तानं लोकांसमोर यायलाच हवा.’
या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध मोहिमां यामध्ये अफजलखानाचा वध , सुरतेची मोहीम आणि आग्र्याहून सुटका याची झलक मोठ्या पडद्यावर सिनेरसिकांना पाहावयास मिळणार आहे. असे अभिनेते , खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.