Tuesday, February 27, 2024
Homeराजकारणपिंपरी-चिंचवडमधील सहा लाख कुटुंबांचे सर्वेक्षण पुर्ण झाल्याचा दावा 

पिंपरी-चिंचवडमधील सहा लाख कुटुंबांचे सर्वेक्षण पुर्ण झाल्याचा दावा 

शहरातील सुमारे सहा लाख घरांना भेटी देऊन मराठा आणि खुल्या प्रवर्गातील कुटुंबांचे सर्वेक्षण शुक्रवार अखेर मुदतीमध्ये पूर्ण करण्यात आले आहे. शेवटच्या तीन दिवसांत ११ टक्के सर्वेक्षण केल्यामुळे मुदतीमध्ये सर्वेक्षण पूर्ण झाल्याचा दावा सहायक नोडल अधिकारी अविनाश शिंदे यांनी केला. शहरात २३ जानेवारीपासून सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते. 

या सर्वेक्षणासाठी महापालिकेने दोन हजार १४३ अधिकारी, कर्मचारी नेमले होते. सर्वेक्षणाची पहिली मुदत ३१ जानेवारीला संपली होती. मात्र, सर्वेक्षण बाकी असल्याने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने दोन दिवसांची मुदत वाढवून दिली होती. शुक्रवार सायंकाळअखेर शहरातील सहा लाख घरांना भेटी देऊन सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे.

नोंदींची माहिती मागासवर्ग आयोगाच्या सर्व्हरवर जमा करण्यात आली आहे. सुरुवातीला सर्व्हर डाऊन होणे, लॉगइनसह अनेक तांत्रिक अडचणी आल्या होत्या. तर, काही भागांमध्ये जात विचारल्यामुळे सर्वेक्षणास विरोध झाल्याचे समोर आले होते. सर्वेक्षणासाठी प्रगणक, सुपर वायझर, नोडल अधिकारी, लिपिक असे दोन हजार १४३ अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले होते. शहरातील सहा लाख घरांना भेटी देऊन दिलेल्या मुदतीमध्ये शंभर टक्के सर्वेक्षण पूर्ण करण्यात आल्याचा दावा शिंदे यांनी केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments