Friday, September 11, 2026
Homeअर्थविश्वपिंपरी-चिंचवड शहरातील पत्रकार भवनाचा प्रश्न मार्गी लावणार; आमदार शंकर जगताप यांचे पत्रकारांना...

पिंपरी-चिंचवड शहरातील पत्रकार भवनाचा प्रश्न मार्गी लावणार; आमदार शंकर जगताप यांचे पत्रकारांना आश्वासन

मराठी पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकारी  कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पिंपरी-चिंचवड शहर तसेच पुणे व पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार समारंभ चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते पिंपळे गुरव येथे उत्साहात पार पडला. यावेळी पत्रकार भवनाच्या मागणीसह पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार शंकर जगताप यांनी दिले.

“पत्रकार भवनाची मागणी पूर्ण करण्यासाठी नक्कीच मदत केली जाईल. पत्रकार भवन तयार होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही,” अशी ठाम भूमिका आमदार जगताप यांनी यावेळी व्यक्त केली.

कार्यक्रमास पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष अभिजित बारणे, मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, प्रदेश उपाध्यक्ष विवेक इनामदार, जिल्हा उपाध्यक्ष विजय गायकवाड, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष रोहित खर्गे, महिला अध्यक्षा अर्चना मेंगडे आदी उपस्थित होते.

यावेळी कार्याध्यक्ष दादाराव आढाव, सचिव बजरंग मासाळ, खजिनदार संतोष जाधव, संपर्कप्रमुख संतोष महामुनी, संदीप सोनार, शफिक शेख, विवेक कुलकर्णी, नागेश खजूरगीकर, सीताराम मोरे, लीना माने, पूनम पाटील, राजश्री आतकरे, संगीता पाचंगे आदी नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचा आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक करताना प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांनी आमदार शंकर जगताप यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. “शंकर जगताप हे विकासासाठी झटणारे आणि संयमी लोकप्रतिनिधी असून पत्रकारांच्या समस्यांबाबतही ते सकारात्मक भूमिका घेतात. जनतेच्या प्रश्नांसाठी ते सातत्याने पाठपुरावा करताना दिसतात,” असे जोशी यांनी सांगितले.

स्थायी समितीचे अध्यक्ष अभिजित बारणे हेही चुकीच्या गोष्टींना विरोध करून चांगल्या कामांना पुढे नेणारे सक्षम लोकप्रतिनिधी असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांनी मुंबई येथे झालेल्या संघाच्या अधिवेशनात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार भवनाबाबत दिलेल्या आश्वासनाची प्रत आमदार शंकर जगताप यांच्याकडे सुपूर्द केली. तसेच प्रस्तावित पत्रकार भवनाला स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे नाव देण्याची इच्छा व्यक्त केली.

आमदार शंकर जगताप यांनी पत्रकार संघाची कार्यकारिणी सर्वसमावेशक असल्याचे सांगत प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांना शहरातून राज्यव्यापी नेतृत्वाची भूमिका मिळणे ही पिंपरी-चिंचवडसाठी अभिमानाची बाब असल्याचे नमूद केले.

प्रदेश उपाध्यक्ष विवेक इनामदार यांनी संघाच्या आगामी उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये पत्रकारांना हेल्मेट वाटप, आरोग्य विमा, पत्रकारांसाठी स्वस्त व हक्काची घरे तसेच अन्य कल्याणकारी योजनांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक इनामदार यांनी केले, तर आभार शहराध्यक्ष रोहित खर्गे यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments