Thursday, February 6, 2025
Homeअर्थविश्वआज होणार ‘आयपीएल’ चा मेगा लिलाव, श्रेयस, शार्दूल, इशान यांच्याकडे लक्ष, इतिहासातील...

आज होणार ‘आयपीएल’ चा मेगा लिलाव, श्रेयस, शार्दूल, इशान यांच्याकडे लक्ष, इतिहासातील सर्वाधिक २० कोटींची महाबोली लागणार…?

धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यर आणि अष्टपैलू कौशल्य जपणारा शार्दूल ठाकूर शनिवारपासून दोन दिवस चालणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) महालिलावात महागडे ठरण्याची शक्यता आहे. या लिलावात ‘आयपीएल’च्या इतिहासातील सर्वाधिक २० कोटींची महाबोली लागण्याची चिन्हे असून १०हून अधिक खेळाडू १० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यासह एकूण १० संघ ५९० खेळाडूंवर बोली लावत आपला संघ परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. यात २२७ परदेशी खेळाडूंचाही समावेश आहे. श्रेयसवर सर्वाधिक रकमेची बोली लागेल, तर शार्दूल आणि यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन या दोघांनाही विक्रमी भाव मिळू शकेल, असा जाणकारांचा अंदाज आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून गेल्या काही हंगामांत प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रेयसवर पंजाब किंग्ज, सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे संघ बोली लावण्याची शक्यता आहे. याशिवाय दीपक चहर आणि यजुर्वेद्र चहल हे दोघेही लिलावात छाप पाडू शकतील.

महेंद्रसिंह धोनी (चेन्नई सुपर किंग्ज), विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु) आणि रोहित शर्मा (मुंबई इंडियन्स) या भारतीय क्रिकेटमधील तीन ताऱ्यांना त्यांच्या संघांनी कायम राखले आहे. कायम राखलेल्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक १७ कोटी मानधन केएल राहुलला मिळाले आहे. पंजाब, हैदराबाद आणि राजस्थान या संघांना मधल्या फळीतील सामन्याला कलाटणी देणारे फलंदाज तसेच नेतृत्वक्षम खेळाडूंचीही आवश्यकता आहे. सामने आणि जेतेपद यावर वर्चस्व राखणाऱ्या धोनीच्या चेन्नई संघालाही नवी फळी तयार करायची आहे. कोलकाता नाइट रायडर्सच्या संघबांधणीसाठी माजी रणजीपटू अभिषेक नायर मेहनत घेत आहे. या संघाने कधीही पूर्णत: तंदुरुस्त नसणाऱ्या वरुण चक्रवर्तीला कायम राखले आहे. कोलकाताकडे फक्त ४८ कोटी रुपये शिल्लक आहे आणि यात संपूर्ण संघ तयार करायचा आहे.

प्रत्येक संघाला कमाल २५ आणि किमान १८ खेळाडूंना संघात स्थान देता येईल. यापैकी जास्तीत जास्त आठ परदेशी खेळाडूंना स्थान देता येऊ शकते. प्रत्येक संघ सरासरी २२ खेळाडूंसह संघबांधणी करू शकेल.

वॉर्नर, डीकॉक, रबाडावर लक्ष
डेव्हिड वॉर्नर,क्विंटन डीकॉक, कॅगिसो रबाडा आणि जेसन होल्डन या परदेशी खेळाडूंवर संघांचे लक्ष असेल. सलामीवीर फलंदाजी आणि नेतृत्वक्षमता असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या वॉर्नरला सूर गवसला आहे. वॉर्नरने २०१६ मध्ये हैदराबाद संघाला जेतेपद मिळवून दिले होते. परंतु त्याच्या नेतृत्वाखाली गतहंगामात संघाची कामगिरी खालावली होती. लखनऊ सुपरजायंट्स हा संघ वॉर्नरवर बोली लावू शकेल.विंडीजच्या होल्डरकडे उत्तुंग फटकेबाजी आणि मध्यमगती गोलंदाजीचे कौशल्य आहे. आफ्रिकेचा यष्टीरक्षक-फलंदाज डीकॉकसाठी अनेक संघ प्रयत्नशील राहतील. याशिवाय ओडीन स्मिथ, रोमारिओ शेफर्ड, आनरिख नॉर्किए हे खेळाडूसुद्धा लिलावाचे आकर्षण ठरू शकतील.

अश्विन, रहाणेबाबत उत्सुकता
ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये फारसा प्रभाव न पाडू शकलेला फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि फलंदाज अजिंक्य रहाणे यांचा दोन कोटी रुपये मूळ किंमत असलेल्या अव्वल श्रेणीत समावेश आहे. परंतु ते कितपत आकडा उंचावतील, याबाबत साशंकता आहे. ७-८ कोटी रुपये लिलावाद्वारे मिळतील, अशी अंबाती रायुडूला अपेक्षा आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आता अपेक्षेनुसार छाप पाडत नाही.

’ वेळ : दुपारी १२ वाजता

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments