९ एप्रिल २०२१,
आयपीएलच्या १४ व्या पर्वाचा आज श्रीगणेशा होतोय. सलामीची लढत गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध रेड आर्मी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात चेन्नईतील चिन्नास्वामी मैदानावर खेळविण्यात येणार आहे. मुंबईचा संघ लाठोपाठ तिसऱ्यांदा आणि आयपीएल इतिहासात सहाव्यांदा आयपीएल स्पर्धेचं जेतेपद मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. तर इतिहासातली पहिली वहिली ट्रॉफी आपल्या नावावर करण्यासाठी आरसीबीचा संघ उत्सुक असेल. या दोन्ही संघात आतापर्यंत झालेल्या सामन्यांत आकडेवारीवर नजर टाकल्यास मुंबईचा पगडा भारी राहिला आहे.
करोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंखेच्या पार्श्वभूमीवर जगातील सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंत आयपीएल टी-२० ( IPL 2021) लीगच्या १४व्या हंगामाला सुरूवात होत आहे. आयपीएल २०२१ची सुरुवात आज शुक्रवारपासून होत आहे. पहिली लढत पाच वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात होणार आहे. बेंगळुरूला आतापर्यंत एकदाही विजेतेपद मिळवता आले नाही. मुंबईचे नेतृत्व रोहित शर्मा तर बेंगळुरूचे नेतृत्व भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली करत आहे.
गेल्या वर्षी करोनामुळे आयपीएल स्पर्धा युएईमध्ये झाली होती. तेव्हा देखील प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला नव्हता. यावर्षी देखील प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही. भारतात या वर्षाच्या अखेरीस टी-२० वर्ल्डकप होणार आहे. यासाठी आयपीएल स्पर्धा एक प्रकारची टेस्टच असेल. जर बीसीसीआयने आयपीएलचे आयोजन यशस्वीपणे केले तर आयसीसीला करोना स्थितीत देखील वर्ल्डकप सुरक्षितपणे होऊ आयोजित केला जाऊ शकतो यावर विश्वास बसेल.
या वर्षी आयपीएल स्पर्धा देशातील सहा शहरात आयोजित होणार आहे. पहिल्या टप्प्यातील २० लढती चेन्नई आणि मुंबईत होणार आहेत. त्यानंतर अहमदाबाद आणि दिल्लीत १६ लढती होतील. तर अखेरच्या २० लढती बेंगळुरू आणि कोलकाता येथे आयोजित केल्या जातील. प्लेऑफ आणि अंतिम लढत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होतील.