इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) यंदा आयपीएल 9 एप्रिलपासून होणार आहे. नव्या पर्वासाठी दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज, पंजाब किंग्स, मुंबई इंडियन्स यांनी आपल्या जर्सीत बदल केला. आता अजून एका संघाने आपली नवीन जर्सी समोर आणली आहे.
आयपीएलच्या पहिल्या हंगामाचा विजेता संघ राजस्थान रॉयल्सने 3D प्रोजेक्शनद्वारे नव्या जर्सीचे अनावरण केले आहे. आपल्या ट्विटर हँडलवरून राजस्थानने ही जर्सी समोर आणली. राजस्थान रॉयल्सने 2008मध्ये आयपीएलचे पहिले विजेतेपद पटकावले. त्यानंतर राजस्थानची कामगिरी फारशी खास राहिली नाही. मागील वर्षी भन्नाट सुरुवात केल्यानंतर राजस्थान स्पर्धेच्या उत्तरार्धात चांगली कामगिरी करू शकला नाही.
राजस्थान रॉयल्सचा पहिला सामना 12 एप्रिल रोजी पंजाब किंग्जशी होणार आहे. या हंगामात राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसनला संघाचा कर्णधार केले आहे. श्रींलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराचीही या मोसमात संघाच्या संचालकपदी निवड झाली आहे.
राजस्थान रॉयल्सच्या संघात संजू सॅमसन (कर्णधार), बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, रियान पराग, श्रेयस गोपाल, राहुल तेवतिया, महिपाल लोमरोर, कार्तिक त्यागी, अँड्र्यू टाय, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, यशस्वी जयस्वाल, अनुज रावत, डेव्हिड मिलर, मनन वोहरा, ख्रिस मॉरिस, शिवम दुबे, मुस्तफिजुर रहमान, चेतन साकारिया, केसी करीप्पा, लियाम लिव्हिंगस्टोन, कुलदीप यादव, आकाश सिंह हे खेळाडू असतील.