Saturday, March 22, 2025
Homeआंतरराष्ट्रीयIPL 2021 : धोनीच्या CSK संघातून या खेळाडूची आयपीएलमधून माघार

IPL 2021 : धोनीच्या CSK संघातून या खेळाडूची आयपीएलमधून माघार

आयपीएलच्या १४ व्या हंगामाला सुरूवात होण्यासाठी जेमतेम ९ दिवस शिल्लक आहेत. यातच आता महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्स संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने आयपीएलमधून माघार घेतली आहे.

हेझलवूडने या वर्षी होणारा टी-२० वर्ल्ड कप आणि अ‍ॅशेस मालिकेचा विचार करुन हा निर्णय घेतल्याचं सांगितलं. शिवाय बायो बबलमधून दूर राहून कुटुंबियांसोबत वेळ घालवायचा असल्याचं त्याने म्हटलं. “बायो बबल आणि निरनिराळ्या वेळेत क्वॉरंटाइन राहून आता १० महिने झालेत. त्यामुळे काही काळासाठी क्रिकेटमधून ब्रेक घेऊन कुटुंबियांसोबत वेळ घालवायचा आहे”, असं हेझललूडने ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट वेबसाइटला सांगितलं. “पुढे हिवाळ्यात आम्हाला खूप क्रिकेट खेळायचं आहे. वेस्टइंडीजचा मोठा दौरा आहे, त्यानंतर बांगलादेश दौरा, टी-२० वर्ल्ड कप आणि नंतर अ‍ॅशेस मालिका. त्यामुळे १२ महीने खूप व्यस्त असणार आहेत. अशात स्वतःला मानसिक आणि शारीरिकरित्या तंदरूस्त ठेवण्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे. यासाठी आयपीएल २०२१ मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला”, असं तो म्हणाला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments