२ नोव्हेंबर २०२०
आयपीएलचा २०२० चा १३ वा हंगाम रोमांचक स्थितीत पोहोचला आहे. या हंगामातील लीग राऊंडमधील 56 पैकी 54 मॅच झाल्या आहेत.मात्र, प्लेऑफमध्ये प्रवेश करणाऱ्या टीम निश्चित झालेल्या नाहीत. मुंबई इंडियन्सने प्ले ऑफमधील स्थान निश्चित केले असून उर्वरित तीन टीम कोणत्या असतील हे पाहण्यासाठी लीग राऊंडमधील 56 व्या सामन्यापर्यंत थांबावे लागणार आहे.
प्लेऑफच्या रेसमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायजर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या टीम रेसमध्ये आहेत. तर चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब प्लेऑफच्या रेसमधून बाहेर गेले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायजर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या चार टीम पैकी 3 टीमला प्लेऑफचं तिकीट मिळेल आणि एका टीमला बाहेरचा रस्ता पकडावा लागणार आहे.

रविवारी झालेल्या डबल हेडरमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांचे आव्हान संपुष्ठात आले. त्याआधी चेन्नई सुपर किंग्जचे आव्हान सर्व प्रथम संपुष्ठात आले होते. मुंबई इंडियन्स १८ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. आज सोमवारी दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यातील लढतीने दुसरे स्थान कोणाला मिळेल हे निश्चित होईल. पण तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी चुरस कायम असेल.
ह्यावर्षीची आयपीएलच्या इतिहासातील सर्वात चुरशीची स्पर्धा ठरली आहे. तळातील दोन संघांनी १२ गुण मिळवले आहेत. साखळी फेरीत फक्त दोन सामने शिल्लक आहेत आणि अद्याप प्ले ऑफमधील तीन संघ निश्चित झाले नाहीत. चेन्नई, पंजाब आणि राजस्थान बाहेर झाले आहेत. काही दिवसांपूर्वी दिल्ली आणि बेंगळुरूचे स्थान निश्चित मानले जाता होते. पण आता काहीच निश्चितपणे सांगता येऊ शकत नाही. आयपीएलमध्ये अखेरच्या सामन्यापर्यंत प्ले ऑफ निश्चित न होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सामन्याच्या निकाला सोबत नेट रनरेट देखील महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.