Friday, September 20, 2024
Homeगुन्हेगारीआक्षेपार्ह व्हिडीओप्रकरणी मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू; ‘या’ तज्ज्ञांची घेणार मदत….

आक्षेपार्ह व्हिडीओप्रकरणी मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू; ‘या’ तज्ज्ञांची घेणार मदत….

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओचे विधिमंडळात पडसाद उमटले. महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या सोमय्या यांना भाजपा पाठीशी घालणार का? असा सवाल विरोधकांनी विधान परिषदेत केला. यावर सोमय्या यांच्यावरील आक्षेपार्ह व्हिडीओची वरिष्ठ पातळीवर सखोल चौकशी केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठिकठिकाणी सोमय्या यांच्या विरोधात आंदोलन केले. दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर मुंबई पोलीस सक्रिय झाले आहेत.

किरीट सोमय्या यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. अंबादास दानवे यांनी हा मुद्दा विधान परिषेदत उचलून धरला. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पेन ड्राईव्ह सादर करत याप्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली. दरम्यान, याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांना चौकशीचे आदेश दिल्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तत्परतेने तपास करण्यास सुरुवात केली आहे.

“मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणातील तपास सुरू केला आहे. तांत्रिक (Technical) आणि सायबर तज्ज्ञांच्या मदतीने गुन्हे शाखा युनिट १० या व्हिडीओमागची सतत्या तपासणार आहेत”, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली असल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

किरीट सोमय्यांंनीची केली होती चौकशीची मागणी
माझ्या संदर्भात काही ध्वनिचित्रफिती समाज माध्यमांमध्ये प्रसारित झाल्या आहेत. माझ्याकडून महिलांचे लैंगिक शोषण झाल्याचा आरोप करण्यात येतो. तथापि, माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अत्याचार झालेला नाही, असा खुलासा किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच प्रसारित झालेल्या ध्वनिचित्रफितीची सत्यता तपासावी, अशी मागणी सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments