Friday, September 29, 2023
Homeअर्थविश्वमहागडया चारचाकी गाडया चोरी करणारया आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश .. ३ कोटी ५८...

महागडया चारचाकी गाडया चोरी करणारया आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश .. ३ कोटी ५८ लाख रूपयांच्या २५ महागडया गाड्या जप्त

३ नोव्हेंबर २०२०,
पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात परराज्यातून चोरून आणलेल्या महागड्या मोटारींचा चेसी नंबर बदलून त्या कमी किंमतीत विकणाऱ्या टोळीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून आतपर्यंत ३ कोटी ५८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच एकूण २५ महागड्या मोटारी आणि १५ इंजिन पोलिसांनी जप्त केल्या आहेत. यातील मुख्य आरोपी हा इन्शुरन्स कंपनीकडून अपघातात नुकसान झालेली मोटर घेऊन आणि हुबेहूब रंगाची मोटार इतर राज्यातून चोरून आणून त्याचा चेसी नंबर बदलून मोटार विकत असे अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे.

या प्रकरणी मनजीत जोगिंदरसिंग मारवा, दीपक चमनलाल खन्ना, प्रतीक उर्फ नागेश छगन देशमुख आणि हारून शरीफ शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यापैकी, मनजीत मारवा याच्या विरोधात दिल्ली, हरियाणा, येथे १२ गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मनजीत मारवा हा गुन्हा उघड झाल्यापासून पसार झाला होता , तेंव्हा पासून गुन्हे शाखा युनिट १चे पथक त्याचे मागावर होते, जेंव्हा सपो. नि. गणेश पाटील व पो. शि. सचिन मोरे यांना माहिती मिळाल्यानंतर मनजीत मारावा आणि हा त्याचा साथीदार असे दोघेजण दिल्ली येथून इनोव्हा आणि क्रेटा अश्या चोरीच्या गाड्या घेऊन पुण्याकडे येत असताना मोशी टोलनाक्यावर सापळा लावून दोन दिवस व एक रात्र थांबले असताना मोशी टोलनाक्यावर संशयित गाड्या जवळ येत असताना दिसल्या परंतु आरोपीने टोलनाक्यावर असलेली गर्दी पाहून पोलीस असल्याचा संशय येताच पुन्हा नाशिक कडे पळ काढला, तेंव्हा पाटील आणि त्यांच्या टीमने ३० किलोमीटर पाठलाग करून दोन्ही गाड्या अडवून आरोपी मनजीत मारवा आणि त्याच्या साथीदार यांना पकडून त्यांच्या ताब्यातील गाड्या जप्त केल्या.

आरोपी मनजित मारवा हा पुण्याच्या कोढवा भागात नविन गोडाऊन भाड्याने घेऊन त्यात गॅरेज सुरू करण्याच्या तयारीत होता. आरोपी मनजित मारवा हा इन्शुरन्स कंपनीकडून अपघातात नुकसान झालेल्या चारचाकी मोटारी कागदपत्रासह विकत घ्यायचा. आरोपी दिपक खन्ना गाडया चोरी करून मनजित मारवा याला देत असल्याचं समोर आलं आहे. त्यात फॉर्च्युनर, इनोव्हा, मारुती इर्टीगासह इतर मोटारीचा समावेश आहे. त्यानंतर त्या गाडीवर अपघातात नुकसान झालेल्या गाडीचा चेसी व इंजिन नंबर असलेला भाग लावून गाडीची पुन्हा कमी किंमतीत विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

आरोपी मनजित मारवा व दिपक खन्ना हे सराईत गुन्हेगार असून आरोपी मनजित मारवा याच्या विरूध्द दिल्ली, हरीयाणा येथे एकूण १२ गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी दिपक खन्ना याचे विरूध्द दिल्ली, हरीयाणा, पंजाब या ठिकाणी ३८ गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा, युनिटची १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments