Wednesday, May 14, 2025
Homeताजी बातमीजागतिक महिला दिनानिमित्त रयत विद्यार्थी विचार मंचतर्फे कर्तव्यदक्ष महिलांचा सन्मान

जागतिक महिला दिनानिमित्त रयत विद्यार्थी विचार मंचतर्फे कर्तव्यदक्ष महिलांचा सन्मान

रयत विद्यार्थी विचार मंच महाराष्ट्र राज्य च्या वतीने मावळ साई सेवाधाम या ठिकाणी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. महिला दिनाच्या निमित्ताने मावळ तालुक्यातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस पाटील यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे, स्वागताध्यक्ष महासचिव संतोष शिंदे, मार्गदर्शक व्याख्याते श्रीविवेक गोविंदराव गुरव, सारिकाताई शेळके (कुलस्वामिनी मंच अध्यक्ष ), तृप्तीताई मांडेकर पुणे पोलिस महासंघ अध्यक्ष, संगीताताई शेळके नगरसेविका, सुरेखा शिंदे PSI कामशेत, पुष्पां घूगे पोलीस नाईक लोणावळा, स्वाती वेदक साई सेवाधाम ट्रस्ट, शीला खोत PSI वडगाव मावळ, ज्योती परदेशी सहाय्यक फौजदार तळेगाव, रूपाली कोहिनकर पोलीस हवालदार लोणावळा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र सहसचिव भाग्यश्री आखाडे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष अजय यादव, मावळ तालुका प्रमुख अतुल वाघमारे, उपाध्यक्ष सागर गायकवाड, संघटक विकी वाघमारे, तळेगाव दाभाडे शहराध्यक्ष श्रुतिका कांबळे, पूजा गायकवाड, व्याख्याते विक्रांत शेळके मावळ तालूका महासचिव, ओमकार शिवेकर तळेगाव दाभाडे शहर उपाध्यक्ष, करुणा शिंदे तळेगाव दाभाडे शहर सचिव, वैष्णवी टाफरे आळंदी शहर उपाध्यक्ष इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन व पूजन करण्यात आले. यावेळी रयत विद्यार्थी विचार मंच संकल्पना मावळ तालुका प्रमुख अतुल वाघमारे यांनी मांडली. तसेच महिला दिनाचे महत्व मावळ तालुका महासचिव व व्याख्याते विक्रांत शेळके यांनी आपल्या खास शैलीत सांगितले. तसेच सारिकाताई शेळके यांनी देखील महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विशाल मोरे यांनी केले.



RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments