दिनांक ८ मार्च हा संपूर्ण जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानुसार पिंपरी चिंचवडचे मा. पोलिस आयुक्त श्री. विनय कुमार चोबे यांनी आज ०९:०० ते १७:०० वा.पर्यंत पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीतील सर्व पोलिस स्टेशनचे डे ऑफिसर म्हणून महिला पोलिस निरीक्षक, महिला सहा. पोलिस निरीक्षक, महिला पोलिस उपनिरीक्षक हे कर्तव्य बजावताना व पोलिस ठाणे घेणार्या सर्व प्रकरणी हाती घेतील असे आदेश दिले.
आयुक्तालय हद्दीतील सर्व पोलिस स्टेशनचे डे ऑफिसर म्हणून महिला पोलिस निरीक्षक, महिला सहा. पोलिस निरीक्षक, महिला पोलिस उपनिरीक्षक यांनी कामकाज पाहिले.
तसेच मा. पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड श्री. विनय कुमार चोबे यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलिस आयुक्तालय, कार्यालय, पिंपरी चिंचवड येथील शिवनेरी हॉल येथे पोलिस आयुक्तालयातील सर्व महिला पोलिस अधिकारी व महिला पोलिस अंमलदार यांच्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता.
महिला पोलिस अधिकारी व महिला पोलिस अंमलदार यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. तसेच मा. पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी मनोगत व्यक्त करून सर्व महिला पोलिस अधिकारी तसेच महिला पोलिस अंमलदार यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.