Monday, May 12, 2025
Homeताजी बातमीमहिला दिनानिमित्त पुष्परचना व सजावट कार्यशाळा संपन्न

महिला दिनानिमित्त पुष्परचना व सजावट कार्यशाळा संपन्न

ग्रोवर्स फ्लॉवर कौन्सिल ऑफ इंडिया व उगम फाउंडेशन हडपसर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाच्या निमित्ताने पुष्परचना व पुष्पसजावट कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. 6 मार्च 2021 रोजी सकाळी दहा ते दुपारी एक या कालावधीत पोदार जम्बो कीड स्कूल मांजरी येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमासाठी चिंचवड येथील स्नेह फ्लोरिस्टचे संचालक पंढरीनाथ म्हस्के यांनी प्रात्यक्षिकांसह महिलांना मार्गदर्शन केले. दहा-दहाच्या तीन गटांना त्यांनी वेगवेगळ्या फुलांच्या रचना सादर केल्या.

ताज्या फुलांची आवड व दैनंदिन जीवनात वापर वाढवून कोरोना महामारीने आलेली मरगळ झटकून एक सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे व महिलांना स्वयंरोजगार करण्यास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, असे ग्रोवर्स फ्लॉवर कौन्सिल ऑफ इंडियाचे संचालक धनंजय कदम यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले.

उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना उगम फाउंडेशनच्या संस्थापिका चेतना बिडवे यांनी पुष्परचना व पुष्प सजावट कार्यशाळेतून मार्गदर्शन घेऊन आत्मनिर्भर व्हावे व स्वावलंबी व्हावे असे आवाहन महिला दिनानिमित्त करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योती सातव यांनी केले. अनिता गायकवाड यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रोवर्स फ्लॉवर कौन्सिल ऑफ इंडियाचे संचालक धनंजय कदम, के एफ बायोप्लँटचे जनरल मॅनेजर आशिष फडके, रोहन जाधव, स्मिदर्स ओऍसिसचे जनरल मॅनेजर होमेन रसेल व जिगर राणा, उगम फाउंडेशनच्या संस्थापिका चेतना बिडवे, सोएक्स फ्लोरा, माधवी ऍग्रो, त्रिमूर्ती फ्लॉवर्स यांनी परिश्रम घेतले.  

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments