Tuesday, April 21, 2026
Homeताजी बातमी“ इन्स्पायर २०२६” या आंतरराष्ट्रीय परिषदेचे एसबीपीआयएम मध्ये आयोजन

“ इन्स्पायर २०२६” या आंतरराष्ट्रीय परिषदेचे एसबीपीआयएम मध्ये आयोजन

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एसबीपीआयएम) यांच्या वतीने “इन्स्पायर २०२६” या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन दि. १३ आणि १४ मार्च २०२६ रोजी करण्यात आले असल्याची माहिती एसबीपीआयएम च्या संचालिका डॉ. किर्ती धारवाडकर यांनी प्रसिद्धीस दिली आहे. 

 परिषदेत “शाश्वत जागतिक भविष्यासाठी व्यवसायिक नव संकल्पनांचा मार्ग”(“Responsible Business Innovation: Driving Change for Sustainable Global Future”) या महत्त्वपूर्ण विषयावर देश विदेशातील संशोधक, प्राध्यापक, उद्योगतज्ज्ञ व विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार आहे.

परिषदेचे उद्घाटन उद्योजक डॉ. प्रशांत पानसरे यांच्या हस्ते होणार आहे. भारत, अमेरिका, युनायटेड किंगडम, कॅनडा, फिलिपिन्स, थायलंड, लेबनॉन आणि दुबई आदी देशांतील संशोधकांनी यासाठी नोंदणी केली आहे. यामध्ये ५३८ लेखक सहभागी होणार आहे. तसेच २४० संशोधन लेख सादर करण्यात येणार आहेत.

  परिषदेसाठी संस्थेच्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर, शैक्षणिक विभाग प्रमुख डॉ. रूपाली कुदरे, डॉ. दिलीप पवार, डॉ. योगेंद्र देवकर, डॉ. काजल माहेश्वरी आणि डॉ. संतोष शिंदे समन्वयक म्हणून काम करत आहेत.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर तसेच कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments