Monday, July 14, 2025
Homeताजी बातमीपीसीयू मध्ये आंतरराज्य मुख्याध्यापक संवाद, संमेलन संपन्न

पीसीयू मध्ये आंतरराज्य मुख्याध्यापक संवाद, संमेलन संपन्न

विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या नवनवीन अध्यापन तंत्रांचा स्वीकार करा – विवेक सावंत

शिक्षण संस्थांनी विद्यार्थी केंद्रित तंत्रज्ञान स्नेही व्हावे – डॉ. गिरीश देसाई

अध्यापन, अध्ययन आणि मूल्यमापनात आयसीटीचा वापर केला पाहिजे. आता शिक्षणातील तंत्रज्ञानाच्या परिवर्तनीय भूमिकेवर लक्ष केंद्रित करून २१ व्या शतकातील विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या नवनवीन अध्यापन तंत्रांचा स्वीकार केला पाहिजे असे आवाहन पीसीयू व्यवस्थापन मंडळाचे सदस्य विवेक सावंत यांनी उपस्थित शिक्षकांना केले. यावेळी त्यांनी एआय आधारित लर्निंग सोल्यूशन्समध्ये शिक्षणाच्या आणि वैयक्तिक शिकण्याच्या संधींचे प्रात्यक्षिक सादर केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) अंतर्गत साते, वडगांव मावळ येथील पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी (पीसीयू) येथे ‘प्रिन्सिपल्स कॉन्क्लेव्ह २०२४’ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पीसीईटी चे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीयू च्या कुलगुरू डॉ. मणिमला पुरी, प्र कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, सीनियर जनरल मॅनेजर एमकेसीेएल अमित रानडे आदी उपस्थित होते. यामध्ये उत्तर प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र, तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा, चंदीगड, पश्चिम बंगाल, बिहार आणि गोवा राज्यातील मुख्याध्यापक आणि शाळा प्रमुख उपस्थित होते. पारंपरिक शैक्षणिक पद्धतीचा अभिनव आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे अर्थपूर्ण वापर करून शिक्षण संस्थांनी विद्यार्थी केंद्रित तंत्रज्ञान स्नेही व्हावे त्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. या उद्देशाने प्रिन्सिपल्स कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी दिली.

डॉ. मणिमला पुरी यांनी पीसीयू आणि पीसीईटी समुहाची ओळख करून दिली आणि विद्यापीठाने दिलेले विविध कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणाबाबतची बांधिलकी या विषयी माहिती दिली. शैक्षणिक उत्कृष्टतेला चालना देण्याच्या आणि सर्व विषयांमध्ये नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींना चालना देण्याच्या विद्यापीठाच्या दृष्टीकोन आहे असेही सांगितले. डॉ. सुदीप थेपडे यांनी पीसीयू मध्ये अनुभवात्मक शिक्षण, आंतरविद्याशाखीय सहयोग आणि शैक्षणिक परिणाम वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाच्या एकात्मतेवर लक्ष केंद्रित करण्यात येत असल्याचे सांगितले.पीसीटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी आयोजन करण्यात मार्गदर्शन केले व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments