१३ जानेवारी २०२०,
शालेय विद्यार्थ्यांमध्ये खिलाडूवृत्ती जागृत झाली पाहिजे,याकरिता महापौर चषक स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खेळाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.असे मत महापौर श्रीम.उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रिडा विभागाचे वतीने आंतरशालेय महापौर चषक क्रिडा स्पर्धा TEEN 20 चे उद्घाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांचे हस्ते इंद्रायणीनगर येथील क्रिडा संकुलामध्ये आज संपन्न झाले त्यावेळी त्या बोलत होत्या.याप्रसंगी उपमहापौर व क्रिडा समितीचे सभापती तुषार हिंगे,स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी,सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार,शिवसेना गटनेते राहुल कलाटे,आयुक्त श्रावण हर्डीकर, क्रिडा समिती सदस्य बाबासाहेब त्रिभुवन,राजु मिसाळ,सागर गवळी,विकास डोळस तसेच नगरसदस्या आशा धायगुडे शेंडगे,मोरेश्वर शेडगे,माजी नगरसदस्य योगेश लोंढे,अतिरिक्त आयुक्त अजित पवार,सहाय्यक आयुक्त संदिप खोत,अण्णा बोदडे,क्रिडा अधिकारी रज्जाक पानसरे,पद्मश्री् व शिवछत्रपती पुरस्कार विजेता खेळाडू क्रिडाशिक्षक व विविध शाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे उपस्थित होते.
महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून केलेल्या भाषणात विद्यार्थ्यांनी वर्षभर शालेय शिक्षण बरोबरच क्रिडा प्रकारातही सहभाग घ्यावा असे आवाहन केले.पक्षनेते एकनाथ पवार यांनी त्यांचे भाषणात उपमहापौर व क्रिडा समितीचे सभापती तुषार हिंगे यांनी उत्कृष्ट असा आगळावेगळा महापौर चषक स्पर्धैचा सोहळा आयोजित केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.याप्रसंगी उपमहापौर व क्रिडा समितीचे सभापती तुषार हिंगे यांनी प्रास्ताविक करताना स्पर्धेत अठरा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला असून महानगरपालिकेच्या विविध मैदानांवर या स्पर्धा होणार असल्याचे नमूद केले.
शिवसेना गटनेते राहुल कलाटे,आयुक्त श्रावण हर्डीकर यांनीही आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमात पद्मश्री पुरस्कार विजेता मुरलीकांत पेटकर व शिवछत्रपती पुरस्कारार्थीना गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर आभार क्रिडा अधिकारी रज्जाक पानसरे यांनी मानले.