Tuesday, February 27, 2024
Homeमहाराष्ट्रसोशल मीडियात स्वतंत्र ओळखीसाठी नाविन्य हवे - प्रा. विश्वनाथ गरुड

सोशल मीडियात स्वतंत्र ओळखीसाठी नाविन्य हवे – प्रा. विश्वनाथ गरुड

पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

अंतःकरणातील परमेश्वर जागा ठेवला तर लोकशाहीच्या मार्गाने कोणतेही आव्हान पेलू शकतो. विवेकाचा आवाज सोपा नाही. पण, कोणतीही मोठी भीषण सत्ता समोर आली तरी त्याचा मुकाबला केला पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार व राजकीय समीक्षक अरुण खोरे यांनी केले.

पत्रकार दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठी पत्रकार संस्था संलग्न पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघ व पिंपरी चिंचवड डिजीटल मीडियाच्या वतीने मंगळवारी (दि.९) वाकड येथे झालेल्या कार्यक्रमात उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जेष्ठ पत्रकार विवेक इनामदार यांना स्वागताध्यक्ष व माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. इनामदार यांचे पत्रकारिता क्षेत्रातील अमूल्य योगदान विचारात घेऊन त्यांना कृतज्ञता निधी म्हणून रोख रक्कम ५१ हजार रुपये, शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी नितीन यादव (प्रशासन भूषण), वाल्मिक कुटे (समाज सेवा), एम. ए. हुसेन (रुग्ण सेवा) आणि माधव पाटील (पर्यावरण प्रेमी) यांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी आमदार उमा खापरे, आयोजक व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे, शहर अध्यक्ष दादाराव आढाव, डिजिटल मीडिया भीमराव तुरुकमारे, उपाध्यक्ष संतलाल यादव, खजिनदार सुनील उर्फ बाबू कांबळे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडीगेरी, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, ठाकरे गटाचे शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले, आपचे शहराध्यक्ष चेतन बेंद्रे, युवा सेनेचे चेतन पवार, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, मारुती भापकर, रेखा दर्शिले, अश्विनी चिंचवडे तसेच रोमी संधू, संदीप भालके, तानाजी बारणे, वंदना आल्हाट, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार जाधव, अनिल वडघुले, बेलाजी पात्रे, गणेश हुंबे, संदेश पुजारी, प्रकाश यादव, गणेश यादव, श्रीपाद शिंदे, शबनम सैयद, रेहान सैयद, नवनाथ कापले यावेळी उपस्थित होते.

अरुण खोरे म्हणाले की, सध्या पत्रकारांवर दबावतंत्र वापरले जात आहे. भारतीय पत्रकारितेपुढे मोठे आव्हान आहे. पत्रकारितेचा सत्व परीक्षेचा हा काळ आहे. या परिस्थितीत पत्रकारांनी निर्भय बनण्याची आवश्यकता आहे. पत्रकाराने कष्ट, वाचन, समाजाचे प्रश्न समजून घेतले पाहिजे आणि राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय प्रश्नांची माहिती असली पाहिजे. सरकारची तळी उचलण्याची आवश्यकता नाही. लोकांचा अद्यापही पत्रकारितेवर विश्वास आहे. पत्रकार खरे सांगतील असे लोकांना वाटले पाहिजे.

आमदार उमा खापरे म्हणाल्या की, पत्रकारितेमध्ये महिलांचा सहभाग वाढत आहे ही उल्लेखनीय बाब आहे. राजकारणी लोकांचे काम पत्रकार जनते समोर मांडतात. पत्रकार चुकीच्या घटनाविरोधात लेखणीच्या टोकाने लिहून प्रहार करतात. राजकारणी लोकांच्या डोक्यात हवा गेल्यास त्याला जागेवर आणण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून होते.

स्वागत अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, पत्रकार वास्तव, सत्य परिस्थिती लोकांसमोर आणत आहेत. पत्रकारांनी निःपक्षपातीपने हे कार्य यापुढेही सुरु ठेवावे. पुरस्काराला उत्तर देताना जेष्ठ पत्रकार विवेक इनामदार म्हणाले की, अरुण खोरे हे माझे पहिले साहेब, गुरू होते आणि गुरूच्या हस्ते पुरस्कार मिळाल्याने विशेष आनंद आहे. पत्रकारिता क्षेत्र आर्थिकदृष्ट्या उदरनिर्वाहाचे साधन नाही, असे असतानाही कुटूंबियांनी साथ दिली. पत्रकारिता करताना विश्वासार्हता निर्माण करणे आवश्यक असते.

प्रास्ताविक करताना बापूसाहेब गोरे म्हणाले, अस्थिर राजकीय वातावरणात पत्रकारिता क्षेत्रावर संकटे येत आहेत. त्यातून मार्ग काढत पत्रकार निःपक्षपातीपने काम करत आहेत. सूत्रसंचालन अक्षय मोरे तर दादा आढाव यांनी आभार मानले. ओम हॉस्पिटलच्या वतीने पत्रकारांना वैद्यकीय प्राथमिक उपचाराचे किट देण्यात आले.

या कार्यक्रमाच्या संयोजनात गणेश शिंदे, सायली कुलकर्णी, संतोष जराड, जितेंद्र गवळी, युनूस खतिब, प्रीतम शहा, कलिंदर शेख, मुकेश जाधव, महेश मंगवडे, संजय बोरा, सुहास आढाव, अल्ताफ शेख, अमोल डंबाळे, विनोद शिंदे, लक्ष्मण रोकडे, प्रसाद बोरसे, माणिक पोळ, यशवंत गायकवाड, श्रीधर जगताप, भारत बांदखेले, राजेंद्र कदम, मुकुंद कदम, शफीक शेख आदींनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments