Sunday, May 17, 2026
Homeताजी बातमीआरटीई प्रवेश मार्गदर्शन मेळाव्यात पालकांनी घेतली आरटीई प्रवेश प्रक्रियेची माहीती

आरटीई प्रवेश मार्गदर्शन मेळाव्यात पालकांनी घेतली आरटीई प्रवेश प्रक्रियेची माहीती

८ फेब्रुवारी २०२१
महाराष्ट्र शासनाचा सर्व शिक्षा अभियान अंतर्गत वंचित व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा अधिकार या RTE 25% प्रवेश प्रक्रिया 9 तारखेपासुन सुरू होत आहे. त्याअनुषंगाने या घटकातील

विदयार्थी पालकांच्या विविध प्रश्नांची उत्तरे व अडीअडचणी दुर होण्यासाठी चिंचवड विधानसभा आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्यावतीने प्रभाग क्र.17 मधील पालकांसाठी RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिये विषयी मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात पालकांनी मोठया संख्येने सहभाग घेत शिक्षण विभागाच्या ‍अधिकारी व शिक्षकांसोबत प्रश्नोत्तर या सत्रात सहभाग घेवून आपल्या प्रश्नांचे निरसन केले. यावेळी महापालिका शिक्षण मंडळाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी पराग मुंडे, पर्यवेक्षक विलास पाटील, राम लेंबे यांनी शासनाचे बदललेले निकष व आदेशांवर माहीती दिली.

यावेळी, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, या प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असलेला तहसिलदार यांचा उत्पन्नाचा दाखला त्वरीत मिळावा व पालकांना मदत व्हावी, या हेतुने आयोजित केलेला ‘तहसिल आपल्या दारी’ हा दि. 12 व 13 फेब्रुवारीला आहे. या उपक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, तसेच आरटीई प्रवेश प्रक्रियेसंदर्भात काही अडचणी असल्याने कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. या उपक्रमाचे विशेष कौतुक प्रशासन अधिकारी पराग मुंडे यांनी केले. यावेळी, भाजपा चिंचवड किवळे मंडल सरचिटणिस प्रदिप पटेल, कामगार आघाडी उपाध्यक्ष शंकर पाटील, प्रभाग अध्यक्ष भगवान निकम, ओबीसी आघाडी सरचिटणीस कैलास रोटे, योगेश महाजन, माऊली जगताप उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments