९ एप्रिल २०२१,
शनिवारी-रविवारी लोक डाऊन संदर्भात अनेक उद्योजक संभ्रमावस्थेत मध्ये आहेत. उद्या कंपन्या चालू आहेत का बंद याविषयी अनेक उद्योजकांचे विचारणा झाली. परंतु आयुक्त आणि जिल्हा उद्योग केंद्र क्षेत्रीय अधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार पूर्वीच सरकारच्या जाहीर केलेल्या नियमावलीनुसार उद्योगांना सूट देण्यात आलेली आहे.शनिवारी-रविवारी इंडस्ट्रीज पूर्ण क्षमतेने सुरू ठेवू शकता फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन चे अध्यक्ष अभय भोर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून माहिती दिली आहे.
एमआयडीसी परिसरातील सर्व कारखाने या काळामध्ये सुरू ठेवावेत तसेच उद्योजकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना आपल्या कंपनीची ओळख पत्र दिल्यास त्यांना जाण्या-येण्यासाठी या काळामध्ये सूट मिळू शकेल याची दखल सर्व उद्योजक मित्रांनी घ्यावी असे आवाहन फॉर्म ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे उद्योजकांना करण्यात येत आहे उद्योग सुरू ठेवणे मध्ये कोणत्याही प्रकारची अडचण जाणवल्यास त्यांनी इंडस्ट्रीज असोसिएशन ची संपर्क साधून त्यावर उपाय योजना करता येईल असे इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी सांगितले.