Tuesday, February 11, 2025
Homeमहाराष्ट्रपिंपरी येथील मोरवाडीत औद्योगिक कचऱ्याला आग; सर्वत्र धुराचे लोट

पिंपरी येथील मोरवाडीत औद्योगिक कचऱ्याला आग; सर्वत्र धुराचे लोट

मोरवाडी न्यायालयाच्या मागील बाजूला मोकळ्या जागेतील औद्योगिक कचऱ्याला बुधवारी दुपारी आग लागली. रबर, प्लास्टिक कचऱ्यामुळे धुराचे लोट सर्वत्र पसरले आहेत. मोरवाडी न्यायालयाच्या इमारतीच्या मागील बाजूला रिकामे मैदान आहे. त्या मैदानात औद्योगिक कचरा टाकला आहे. त्यामध्ये रबर, प्लास्टिक साहित्य होते. दुपारी या कचऱ्याला आग लागली. आग मोठ्या प्रमाणात धुमसत होती. धुराचे लोट सर्वत्र पसरले. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. जवळच असलेल्या एम्पायर इस्टेट इमारतीमध्ये हा धूर पसरला. तसेच ऑटो क्लस्टर आणि मोरवाडीमध्ये धुराचे लोट पसरले.

घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. शहरातील सर्व अग्निशमन पथके घटनास्थळी दाखल झाली. पीएमआरडीए, एमआयडीसी, टाटा मोटर्सचे बंबही बोलविले होते. आग आटोक्यात आल्याचे अग्निशम विभागाने सांगितले. दरम्यान, पिंपळे सौदागर संरक्षण हद्दीतील मोकळ्या मैदानावरील गवताला आग लागली होती. ती आग ही आटोक्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments