१० जानेवारी २०२०,
चालू आर्थिक वर्षात आर्थिक विकास दर ११ वर्षांतील निच्चांकी पातळीवर राहण्याचा अंदाज व्यक्त होत असतानाच, भारतीय अर्थव्यवस्थेचे मूळ मजबूत असून, त्यात पुन्हा उसळी घेण्याची पूर्ण क्षमता आहे, अशी आशा व्यक्त केली आहे. आगामी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी झालेल्या एका बैठकीत मोदी बोलत होते.
पंतप्रधान मोदी यांनी याआधी विविध क्षेत्रांतील दिग्गजांसोबत जवळपास डझनभर बैठका घेतल्या आहेत. अर्थव्यवस्थेला मारक ठरणाऱ्या विविध मुद्द्यांसह आगामी अर्थसंकल्पात प्रभावी योजना आणण्यासंदर्भात चर्चा केल्याचं सांगितलं जात आहे. मोदी यांनी गुरुवारी, अर्थतज्ज्ञ, विविध क्षेत्रांतील विशेषज्ञ आणि यशस्वी युवा उद्योजकांसोबत सल्लामसलत केली. २०२४पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ५ हजार अब्ज डॉलरपर्यंत नेण्याच्या दिशेनं एकत्रित येऊन प्रयत्न करावेत, असं आवाहन त्यांनी केलं..