Thursday, January 16, 2025
Homeअर्थविश्वशेअर बाजार उघडताच निर्देशांकात तेजी; सेन्सेक्स पुन्हा ६० हजार पार, निफ्टीत १००...

शेअर बाजार उघडताच निर्देशांकात तेजी; सेन्सेक्स पुन्हा ६० हजार पार, निफ्टीत १०० अंकांची उसळी

शुक्रवारच्या तुलनेत आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात थोडी दिलासादायक झाली आहे. मात्र असे असूनही सेन्सेक्सची सुरुवात घसरणीनेच झाली. आजपासून २०२२ च्या शेवटच्या व्यावसायिक आठवड्याची सुरुवात झाली आहे, त्यामुळे येत्या पाच दिवसात बाजाराची वाटचाल खूप महत्वाची असणार आहे. आज, देशांतर्गत बाजाराच्या सुरुवातीला सेन्सेक्स लाल चिन्हाने उघडला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी वाढीच्या हिरव्या चिन्हात दिसला.

सुरुवातीच्या १५ मिनिटांतच जोरदार तेजी…
बाजार उघडल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांतच शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स ३४४.२३ अंक म्हणजेच ०.५८ टक्क्यांनी वाढून ६० हजार पार पोहोचला. सध्या सेन्सेक्स निर्देशांक ६०,१८९.५२ वर व्यवहार करत आहे. याशिवाय एनएसईचा निफ्टी १०१.५० अंकांनी म्हणजेच ०.५७ टक्क्यांच्या मजबूतीसह १७,९०८.३० वर व्यवहार करत आहे. गेल्या चार दिवसांपासून शेअर बाजारात सातत्याने घसरण सुरू होती.

बाजाराच्या सुरुवातीची स्थिती…
आजच्या व्यवहारात बाजाराच्या सुरुवातीच्या वेळी, एनएसईचा निफ्टी २३.६ अंकांनी चढून १७,८३०.४० च्या पातळीवर उघडला. दुसरीकडे, बीएसईचा ३० शेअर्सचा निर्देशांक, सेन्सेक्स ९०.२१ अंक म्हणजेच ०.१५ टक्क्यांनी घसरून ५९,७५५.०८ वर उघडला.

दरम्यान, बाजार उघडण्यापूर्वी शेअर बाजारात संमिश्र चाल दिसून आली. एनएसईचा निफ्टी १६.३५ अंक म्हणजेच ०.०९ टक्क्यांच्या वाढीसह १७,९२३.१५ च्या पातळीवर व्यवहार करत होता. त्याच वेळी, बीएसईचा सेन्सेक्स ८०.४७ अंक किंवा ०.१३ टक्क्यांनी घसरून ५९,७६४.८२ च्या पातळीवर व्यवहाराची सुरुवात केली.

सेन्सेक्समध्ये बजाज फायनान्सचा सर्वाधिक तोटा झाला आणि समभागात सकाळी ०.६७ टक्क्यांनी घसरला. याशिवाय रिलायन्स, नेस्ले, टायटन, आयसीआयसीआय बँकेचे शेअर्सही सकाळी घसरणीसह व्यवहार करत होते. त्याच वेळी, पॉवर ग्रिडच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली असून SBI, टाटा स्टील, टाटा मोटर्स, मारुती या कंपन्यांचे शेअर्सही तेजीसह व्यवहार करत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments