लॉरेन्स अँड मेयो अर्थात भारतामधील सर्वात जुने ऑप्टीशिअन्स जे आजही आहेत अत्यंत प्रगतशील !
सण १८७७ मध्ये कोलकत्ता येथे उघडण्यात आलेले लॉरेन्स अँड मेयोचे शोरूम हे भारतातील नि:शय पहिले शोरूम होते.भारतामधील ४० शहरांमध्ये असणाऱ्या १०० हुन अधिक शाखामध्ये आपली सेवा पुरवीत आहेत.लॉरेन्स अँड मेयो हे भारतामध्ये ISO 9001:2015 हे प्रमाणपत्र मिळविणारे पहिले ऑप्टीशिअन्स आहेत तसेच १९३७ मध्ये प्रथम रे-बॅन सनग्लासेस देणारे आणि १९७५ मध्ये सुद्धा प्रथम कॉन्टॅक्ट लेन्सचे वितरण करणारे ऑप्टीशिअन्स आहे.
लॉरेन्स अँड मेयोकडे आहे शतकाहूनही अधिक काळाचा अनुभव आणि दिमतीला आहे अत्यंत कुशल तंत्रज्ञ! त्यामुळेच लॉरेन्स अँड मेयो हे मनपसंत आणि उच्च दर्जाचे ब्रँड्स, अत्याधुनिक डोळे तपासणी आणि डिस्पेंसिंग सर्व्हिसेस उपलब्ध असलेले ठिकाण बनले आहे.
लॉरेन्स अँड मेयोकडे असणारे ऑप्टोमेट्रीस्ट हे उच्च गुणवत्ताप्राप्त आणि अनुभवी असल्याने डोळ्यांची परिपुर्ण तपासणी करण्यास सक्षम आहेत
लॉरेन्स अँड मेयो यांनी ग्राहकाला उत्कृष्ट सेवा प्रदान करताना ग्राहकांच्या पैशाची खऱ्या अर्थाने किंमत केली आणि सेवेप्रती दृढविश्वास दर्शविताना आपल्या ग्राहकांचा विश्वास जिंकला.लॉरेन्स अँड मेयो मध्ये अत्यंत प्रतिष्ठित ग्राहकांचा समावेश आहे.
ते म्हणतात,”महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरू, जे.आर.डि टाटा यांसारख्या महान दृष्टयांचाही आमच्या काही प्रमुख सन्माननीय ग्राहकांमध्ये समावेश आहे हे सांगायला आम्हाला अभिमान वाटतो.आमच्या असंख्य ग्राहकांच्या विनंतीस मन देऊन आम्ही त्याच परिसरात नवीन जागेत स्थलांतरित झालो आहोत”.