G20 परिषदेनंतर भारत आणि कॅनडामधील संबंध आणखी बिघडले. दिवसेंदिवस हे संबंध आणखी खराब होत चालले आहेत. दोन्ही देशांनी आधी परस्परांच्या डिप्लोमॅट्सवर कारवाई केली. या सगळ्या तणावाचा दोन्ही देशातील व्यापारी संबंधांवर परिणाम होणार आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निरजरच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केला. त्यानंतर हा वाद आणखी वाढला. G20 परिषदेसाठी जस्टिन ट्रूडो भारतात आले होते. त्यावेळी सुद्धा त्यांचं वर्तन खूपच अनपेक्षित होतं. दिल्लीत राजघाटवर पुष्पांजली वाहण्याचा कार्यक्रम झाला. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी जस्टिन ट्रूडो यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी आपला हात पुढे केला. पण ट्रूडो यांनी आपला हात मागे खेचून घेतला. त्याशिवाय भारताच्या राष्ट्रपतींनी G20 देशांच्या प्रमुखांसाठी डिनरच आयोजन केलं होतं. त्यामध्ये सुद्धा ट्रूडो सहभागी झाले नाहीत.
जस्टिन ट्रूडो मायदेशी परतल्यानंतर त्यांनी दोन्ही देशाच्या व्यापारी संबंधांवर परिणाम होतील, असे काही निर्णय घेतले. भारताने सुद्धा कॅनडाला त्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे दिवसेंदिवस दोन्ही देशातील संबंध आणखी खराब होत चालले आहेत. भारताने आता कॅनडाविरोधात सर्वात मोठ पाऊल उचललं आहे. भारताने कॅनडाच्या नागरिकांसाठी व्हिसा सेवा बंद केली आहे. भारताकडून आतापर्यंतची ही सर्वात मोठी Action आहे. “पुढील सूचना मिळेपर्यंत कॅनडाच्या नागरिकांसाठी व्हिसा सेवा स्थगित करण्यात आली आहे” असं भारताने म्हटलं आहे. खालिस्तान समर्थक हरदीप सिंह निज्जरच्या हत्येनंतर वाद वाढत चालला आहे. सर्वप्रथम कॅनडाने भारताविरोधाक स्टेटमेंट देण्यास सुरुवात केली. कॅनेडियन पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर गंभीर आरोप केले. निज्जरच्या हत्येसाठी भारताला जबाबदार धरलं.
गुरपतवंत सिंह पन्नूच्या समर्थकांनी काय केलं?
भारताने कॅनडाला चाललेल्या सर्व नागरिकांना सावध राहण्याची सूचना केली आहे. तिथे राहणाऱ्या भारतीयांना सुद्धा सर्तक राहण्यास सांगितलं आहे. कॅनडामध्ये भारतविरोधी कारवाया, गुन्हे वाढत चालले आहेत. त्या पार्श्वभूमीवर एडवायजरी जारी करण्यात आली आहे. कॅनडातील खासदार चंद्रा आर्य यांनी दावा केला होता की, गुरपतवंत सिंह पन्नूच्या समर्थकांनी कॅनडामध्ये राहणाऱ्या हिंदू नागरिकांना लक्ष्य केलं.