Sunday, August 16, 2026
Homeआरोग्यविषयकभारताचा कुस्तीपटू बजरंग पुुनिया आपल्या सेमीफायनलच्या सामन्यात पराभूत, ब्राँझची आशा कायम

भारताचा कुस्तीपटू बजरंग पुुनिया आपल्या सेमीफायनलच्या सामन्यात पराभूत, ब्राँझची आशा कायम

५ ऑगस्ट २०२१,
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताचा कुस्तीपटू बजरंग पुुनिया आपल्या सेमीफायनलच्या सामन्यात पराभूत झाला आहे. बजरंगचा सामना तीन वेळचा विश्वविजेता आणि रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता अझरबैजानच्या हाजी अलीवशी झाला. या सामन्यात अझरबैजानच्या कुस्तीपटूने बजरंगला १२-५ ने पराभूत केले. याआधी कुस्तीपटू रवी दहियाने गुरुवारी भारतासाठी रौप्यपदक जिंकले.

बजरंग पुनिया पहिल्या फेरीत १-४ ने पिछाडीवर होता. त्याने दुसऱ्या फेरीत काही चांगले डावपेच खेळले. मात्र हाजी अलीवने या फेरीतही गुण घेत आपली आघाडी वाढवली. दोन मिनिटे असताना बजरंगने चॅलेंज घेतले, पण ते अयशस्वी ठरले. बजरंगने उपांत्यपूर्व फेरीत आपल्या अनुभवाचा आणि कौशल्याचा चांगला वापर करून ६५ किलो वजनी गटात इराणच्या मुर्तझा चेका घियासीवर विजय नोंदवला होता. आशियाई स्पर्धेत कांस्यपदक विजेता असलेल्या मोर्तेजा आणि बजरंगमध्ये कडवी झुंज बघायला मिळाली.

पुरुष फ्रीस्टाइल प्रकारात कुस्तीगीर बजरंग पुनियाच्या कामगिरीकडे देशाचे लक्ष होते. २०१६च्या रिओ ऑलिम्पिकला मुकल्यानंतर बजरंगने सगळ्याच आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धात आपला ठसा उमटवला. २०१८ आणि २०१९च्या विश्वचषक स्पर्धामध्येही त्याने एक रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments