Tuesday, April 21, 2026
Homeआंतरराष्ट्रीयभारतीय प्रादेशिक मणिपूरी सिनेमाचा जागतिक डंका; ‘बूंग’ने जिंकला “बाफ्टा २०२६”

भारतीय प्रादेशिक मणिपूरी सिनेमाचा जागतिक डंका; ‘बूंग’ने जिंकला “बाफ्टा २०२६”

भारतीय चित्रपटसृष्टीसाठी आणि विशेषतः ईशान्य भारतासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण लंडनमध्ये अनुभवायला मिळाला. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या Excel Entertainment या बॅनरखाली तयार झालेल्या मणिपुरी भाषेतील ‘बूंग’ (Boong) या चित्रपटाने प्रतिष्ठेचा BAFTA Awards २०२६ पुरस्कार पटकावून इतिहास रचला आहे.

लंडनमधील Royal Festival Hall येथे पार पडलेल्या सोहळ्यात ‘Best Children’s & Family Film’ या गटात ‘बूंग’ने बाजी मारली. विशेष म्हणजे या चित्रपटासमोर Zootopia 2, Lilo & Stitch आणि Arco यांसारख्या मोठ्या बजेटच्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे तगडे आव्हान होते. मात्र साध्या, भावनिक आणि वास्तववादी कथेमुळे ‘बूंग’ने जागतिक मंचावर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.

या चित्रपटाचे दिग्दर्शन नवोदित दिग्दर्शिका लक्ष्मीप्रिया देवी यांनी केले आहे. पुरस्कार स्वीकारताना त्यांनी अत्यंत भावुक भाषण करत मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी अशी प्रार्थना केली. त्यांनी विस्थापित मुलांच्या आयुष्यात पुन्हा आनंद आणि निरागसता परत यावी, अशीही भावना व्यक्त केली.

‘बूंग’ची कथा मणिपूरमधील सामाजिक परिस्थिती आणि एका कुटुंबाच्या भावनिक प्रवासावर आधारित आहे. एका लहान मुलाचा आपल्या बेपत्ता वडिलांच्या शोधासाठी सुरू झालेला प्रवास आणि आईसाठी त्यांना परत आणण्याची निरागस इच्छा — ही कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडते.

या ऐतिहासिक क्षणी फरहान अख्तर आणि त्यांची पत्नी शिबानी दांडेकर हे देखील सोहळ्याला उपस्थित होते. ईशान्य भारतातील प्रादेशिक चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश भारतीय सिनेसृष्टीसाठी मोठी प्रेरणादायी घटना ठरत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments