Tuesday, March 18, 2025
Homeआंतरराष्ट्रीयभारतीय पुरुष हॉकी संघाचा अर्जेंटिनावर विजय

भारतीय पुरुष हॉकी संघाचा अर्जेंटिनावर विजय

भारतीय पुरुष हॉकी संघाने अर्जेंटिना हॉकी दौऱ्यात सलामी विजय मिळवला आहे. विद्यमान ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटिनाचा ४-३ असा पराभव करत पहिल्या सराव सामन्यात भारतीय संघाने आपली सुरूवात केली आहे.

मंगळवारी मध्यरात्री झालेल्या या सामन्यात भारताकडून निळकंठ शर्मा (१६व्या मिनिटाला), हरमनप्रीत सिंग (२८व्या मिनिटाला), रुपिंदरपाल सिंग (३३व्या मिनिटाला) आणि वरुण कुमार (४७व्या मिनिटाला) यांनी गोल करत विजयात योगदान दिले. लिआंड्रो टोलिनी (३५व्या आणि ५३व्या मिनिटाला) आणि मायको कॅसेला (४१व्या मिनिटाला) यांनी यजमानांसाठी गोल केले.

‘‘उत्कंठावर्धक रंगलेला हा उत्तम सराव सामना होता. दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ केला. ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटिनासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध विजय मिळवणे ही खूपच चांगली बाब म्हणावी लागेल. या विजयामुळे आमचा आत्मविश्वास उंचावला आहे,’’ असे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments