Tuesday, March 18, 2025
Homeक्रिडाविश्वदुःखद बातमी! मराठमोळ्या क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या आजीचं निधन

दुःखद बातमी! मराठमोळ्या क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या आजीचं निधन

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या संदर्भात एक वाईट बातमी समोर आली आहे. अजिंक्यची आजी झेलूबाई बाबूराव रहाणे यांचे निधन झाले आहे. अजिंक्यचे वडील मधूकर रहाणे यांनी ही माहिती दिली. संगमनेर येथे राहणाऱ्या अजिंक्यच्या आजीने वयाची शंभरी गाठली होती.

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात अजिंक्यने आपल्या आजीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, ही इच्छा अपूर्णच राहिली आहे. एका मुलाखतीमध्ये संगमनेरला कधी जाणार, असा प्रश्न अजिंक्यला विचारण्यात आला होता. त्यावेळी अजिंक्य म्हणाला ”माझी आजी संगमनेरला असते. तिला भेटायची माझी इच्छा आहे. कोरोनाची परिस्थिती सुधारली, की लगेचच मी माझ्या आजीची भेट घेण्यासाठी संगमनेर येथे जाईन.”

तब्बल तीन दशकांनंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध गाबा खेळपट्टीवर विजय मिळविला होता. बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेचा चौथा सामना ब्रिस्बेनच्या गाबा खेळपट्टीवर खेळवण्यात आला. या मैदानावर मागील 32 वर्षांपासून भारताला विजय मिळवता आला नव्हता. मात्र, अंजिक्य रहाणेच्या संघाने हा इतिहास घडवला. शिवाय, ही मालिकाही 2-1 अशी नावावर केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments