यशस्वी संस्थेतर्फे आयोजित” जागतिक स्तरावरील सध्याच्या उदयोन्मुख संधी” या विषयावर भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर, यांच्या पुण्यातील प्रमुख नागरिकांशी वार्तालाप कार्यक्रम पार पडला.
या वेळी केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, यशस्वी ग्रुपचे विश्वेश विश्वेश कुलकर्णी, विशाल चोरडिया, नॅशनल बुक ट्रस्टचे विश्वस्त राजेश पांडे आदि प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
भारतात मागील अकरा वर्षांपासून स्थिर सरकार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचा विस्तार झाला असून रस्ते रेल्वे मार्ग आणि मेट्रो यामुळे परकीय गुंतवणूकदार भारताकडे आकर्षित होत आहेत.भारताने मागील अकरा वर्षांमध्ये चंद्रयान मोहीम याचबरोबर व्हॅक्सिन डिप्लोमा सी च्या माध्यमातून जगात आपली प्रतिमा उंचावली जगाचा भारतावर विश्वास वाढला असून भारत हा ब्रिक्स, कॉड या संस्थांसोबत समन्वयाने समांतर पद्धतीने काम करत आहे . असल्याची एस जय शंकर म्हणाले,
यावेळी पुणे जिल्ह्यातील उद्योग व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर यांच्यासह मोठ्या संख्येने युवक युवती उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशस्वी संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सदस्य सिनेट सदस्य प्रसेनजीत फडणवीस यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता करमरकर यांनी केले. सामूहिक राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.