Monday, June 8, 2026
Homeबातम्याIND vs ENG : कोहलीच्या नावे 'हा' विक्रम नको होता; धोनीच्या नकोशा...

IND vs ENG : कोहलीच्या नावे ‘हा’ विक्रम नको होता; धोनीच्या नकोशा विक्रमाची केली बरोबरी

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना सुरू आहे. कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघ अडचणीत सापडल्याचे दिसून आले. संघाची निराशाजनक सुरूवात झाली. शुभमन गिलनंतर मैदानावर आलेला पुजार बाद झाला. पण सर्वात त्यानंतर कर्णधार कोहलीने यावेळी चाहत्यांची निराशा केली. सामन्याच्या पहिल्या डावात कोहली शून्यावरच बाद झाला. आतापर्यंत कसोटी कारकीर्दीत कोहली १२व्यांदा शून्यावर बाद झाला. यामुळेच सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम आता धोनीबरोबर कोहलीनेही केला आहे.

दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मा मैदानावर आले. पुजारा बाद झाल्यानंतर कोहली खेळायला आला. मात्र, त्याला चांगला खेळ करता आला नाही. बेन स्टोक्सने विराटला बाद केलं. विराट भोपळाही न फोडता मैदानावरून परतला. कसोटी कारकीर्दीत विराट कोहली १२व्यांदा बाद झाला आहे.

त्याचबरोबर विराटच्या नावे नकोशा विक्रमाचीही नोंद झाली आहे. कर्णधार म्हणून विराट शून्यावर बाद होण्याची ही ८ वी वेळ होती. विराटने धोनीच्या नकोशा विक्रमाची बरोबरी केली. धोनीही कसोटीमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करताना ८ वेळा शून्यावर बाद झालेला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments