चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये पहिली कसोटी खेळण्यात येत आहे. पहिल्या डावातील सुरुवात निराशाजनक राहिली. रोहित शर्मा आणि शुबमन गिलला जोफ्रा आर्चरने आऊट केलं. टीम इंडियाने लंचपर्यंत 2 विकेट्स गमावून 59 धावा केल्या आहेत. कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा मैदानात खेळत आहेत. टीम इंडिया अजूनही 519 धावांनी पिछाडीवर आहे.
टीम इंडियाने पहिल्या डावात 50 धावा पूर्ण केल्या आहेत. 2 विकेट्स गमावून 50 धावा केल्या आहेत. कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा मैदानात खेळत आहेत.
इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 578 धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून कर्णधार जो रुटने सर्वाधिक 218 धावांची खेळी केली. तर डोमिनिक सिबलेने 87 तर बेन स्टोक्सने 82 धावा केल्या. टीम इंडियाकडून रवीचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.