Tuesday, March 18, 2025
Homeआरोग्यविषयकचिंताजनक! देशात २४ तासांत आढळले १,४५,३८४ रुग्ण; ८०० रुग्णांचा मृत्यू

चिंताजनक! देशात २४ तासांत आढळले १,४५,३८४ रुग्ण; ८०० रुग्णांचा मृत्यू

महाराष्ट्रासह देशाभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा वेग प्रचंड वाढला आहे. मागील २४ तासांतील आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली असून, एक नवा उच्चांक नोंदवला असल्याचे दिसून आले आहे. देशात २४ तासांत पहिल्यांदाच तब्बल दीड लाखांच्याजवळपास रुग्ण आढळून आले असून, ८०० रुग्णांना जीव गमावावा लागला आहे. गर्दी आणि कोरोना नियमाबद्दलची उदासिनता यामुळे दिवसेंदिवस रुग्णासंख्या नवा उच्चांक गाठताना दिसत आहे.

देशभरात गेल्या २४ तासांत तब्बल एक लाख ४५ हजार ३८४ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत ७७ हजार ५६७ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंता वाढवणारी गोष्ट म्हणजे देशातील मृतांच्या आकड्यात मोठी वाढ झाली आहे. २४ तासांत ७९४ म्हणजेच जवळपास ८०० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या १ कोटी ३२ लाख ५ हजार ९२६ इतकी झाली आहे.

राज्यात शुक्रवारीही रुग्णसंख्या वाढीचा आलेख कायम राहिला. दिवसभरात ५८ हजार ९९३ नवीन करोनाबाधित आढळून आले. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments