भारताकडून 84 देशांना 6.45 कोटी डोसेस लसीची निर्यात करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून शुक्रवारी (दि.०९) देण्यात आली. 6.45 कोटी डोसेसपैकी 1.05 कोटी डोसेस 44 देशांना अनुदान म्हणून देण्यात आले असून 25 देशांना 3.58 कोटी डोसेस व्यापारी कंत्राटापोटी देण्यात आले आहेत. याशिवाय 39 देशांना 1.82 कोटी डोसेस जागतिक आरोग्य संघटनेच्या को-व्हॅक्स फॅसिलिटीद्वारे देण्यात आले आहेत.
भारतातील लसीकरणाचा विचार केला तर शुक्रवार सकाळच्या आकडेवारीनुसार 9 कोटी 43 लाख 34 हजार 262 डोसेस देण्यात आले आहेत. गेल्या चोवीस तासात 36 लाख 91 हजार 511 डोसेस देण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात दिवसाला सरासरी 43 लाख डोसेस देण्यात आल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.