Friday, June 21, 2024
Homeताजी बातमीभारत पाकिस्तान पहिला सामना 2 सप्टेंबर होणार .. जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक

भारत पाकिस्तान पहिला सामना 2 सप्टेंबर होणार .. जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक

आशिया चषकात भारताचा पहिला सामना 2 सप्टेंबर 2023 रोजी पाकिस्तानविरोधात होणार आहे. हा सामना श्रीलंकामधील कँडी येथील मैदानात होणार आहे. पाकिस्तान आणि नेपाळ यांच्या सामन्याने आशिया चषकाची सुरुवात होणार आहे. पहिला सामना पाकिस्तानमधील मुल्तान मैदानावर रंगणार आहे. भारतीय संघ वगळता इतर सर्व संघ पाकिस्तानमध्ये किमान एक सामना तरी खेळणार असल्याचे समजतेय. 30 ऑगस्ट 2023 ते 17 सप्टेंबर 2023 या दरम्यान आशिया चषकाचा थरार रंगणार आहे.
Revsportz या क्रिकेट संकेतस्थळाने आशिया चषकाचे वेळापत्रक जारी केले आहे. यानुसार, भारताने दोन्ही सामने श्रीलंकामध्ये कँडी मैदानावर होणार आहेत. आशिया चषकाचे एकूण 13 सामने होणार आहेत. यापैकी चार सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत. तर 9 सामने श्रीलंकामध्ये होणार आहेत.

तारीखफेरीसामनाठिकाण
30 ऑगस्ट 20231पाकिस्तान vs नेपाळमुल्तान, पाकिस्तान
31 ऑगस्ट 20231बांगलादेश vs श्रीलंकाकँडी, श्रीलंका
2 सप्टेंबर 20231पाकिस्तान vs भारतकँडी, श्रीलंका
3 सप्टेंबर 20231बांगलादेश vs अफगाणिस्तान लाहोर, पाकिस्तान
4 सप्टेंबर 20231भारत vs नेपाळ कँडी, श्रीलंका
5 सप्टेंबर 20231श्रीलंका vs अफगाणिस्तानलाहोर, पाकिस्तान
6 सप्टेंबर 20232 (सुपर – 4)A1 vs B2लाहोर, पाकिस्तान
9 सप्टेंबर 20232 (सुपर – 4)B1 vs B2कँडी, श्रीलंका
10 सप्टेंबर 20232 (सुपर – 4)A1 vs A2कँडी, श्रीलंका
12 सप्टेंबर 20232 (सुपर – 4)A2 vs B2दांबुला, श्रीलंका
14 सप्टेंबर 20232 (सुपर – 4)A1 vs B1 दांबुला, श्रीलंका
15 सप्टेंबर 20232 (सुपर – 4)A2 vs B2दांबुला, श्रीलंका
17 सप्टेंबर 2023 फायनलS4 1 vs S4 2कोलंबो, श्रीलंका

आज येणार आशिया चषकाचे वेळापत्रक –

बीसीसीआय आणि पीसीबी यांच्या सहमतीने आशिया चषक हायब्रिड मॉडेलनुसार खेळवण्यात येणार आहे. आज बुधवार, 19 जुलै रोजी आशिया चषकाचे अधिकृत वेळापत्रक जारी होणार आहे. पीसीबीचे चेअरमन जाका अशरफ बुधवारी संध्याकाळी 7.15 वाजता (पाकिस्तानमधील वेळेनुसार) आशिया चषकाचे वेळापत्रक जारी करणार आहेत. भारतीय वेळानुसार हे वेळापत्रक रात्री 8.15 वाजता समोर येणार आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्थान आणि नेपाळ या देशांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. 13 एकदिवसीय सामन्यानंतर आशियाचा किंग कोण ? यावरुन पडदा उठणार आहे.

कुठे पाहाता येणार सामने?

31 ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकामध्ये आशिया चषक रंगणार आहे. भारतीय चाहत्यांसाठी आशिया चषकाचे लाईव्ह स्ट्रिमिंग हॉटस्टारवर पाहाता येईल. त्याशिवाय स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह सामने पाहाता येणार आहेत. त्याशिवाय एबीपी माझ्याच्या संकेतस्थळावरही आशिया चषकासंदर्भातील अपडेट तुम्हाला पाहाता येतील. आशिया चषकासाठी हायब्रिड मॉडेल वापरण्यात आलेय. पाकिस्तानमध्ये चार सामने होणार आहेत. तर उर्वरित सर्व सामने श्रीलंकामध्ये खेळवण्यात येणार आहेत. हायब्रिड मॉडेलचा स्विकार केल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये जाणार नाही? हे स्पष्ट झालेय. टीम इंडियाचे सर्व सामने श्रीलंकामध्ये खेळवण्यात येणार आहेत. बुधवारी आशिया चषक वेळापत्रकाची घोषणा होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थरारक सामना श्रीलंकामध्ये होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments